स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांची प्रेरणा: युवासेवकांनी मूकबधिर विद्यालयात केले स्कूल बॅग वाटप

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्वत्र प्रेरणादिन साजरा केला आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे वतीने लायन्स मूकबधिर व अपंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप,आरोग्य तपासणी,मोफत रिपोर्ट काढण्याचा उपक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमास मा.आ. स्नेहलताताई कोल्हे उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते स्कूल बॅग वितरण करण्यात आले.

माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी नेहमी मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा विचार ठेऊन काम केले. समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. कोपरगाव आणि परिसराचे नंदनवन होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत दूरदृष्टी जोपासली. संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि त्यांना मार्गदर्शन करणारे युवानेते विवेकभैय्या कोल्हे हे सातत्याने आदर्श उपक्रम राबवत असतात. खऱ्या अर्थाने युवकांना घडवण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. स्व. कोल्हे साहेबांच्या आदर्श कार्याचा विचार डोळ्यासमोर ठेवत आदर्श उपक्रम राबवला आणि प्रेरणा घेतली त्याबद्दल त्यांनी युवकांचे कौतुक केले.

यावेळी युवासेवक सिद्धार्थ साठे म्हणाले कोल्हे साहेब हे केवळ एक नाव नाही तर आजच्या पिढीसाठी एक ऊर्जा आहेत.कुठल्याही परिस्थितीत हार न मानता समाजासाठी काम कसे करावे यासाठी साहेबांची जयंती प्रेरणादिन म्हणून आम्ही साजरी करत आहोत.पिढी घडण्यासाठी काम करावे हा साहेबांचा विचार घेऊन मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी, बॅग वाटप उपक्रम घेण्याची प्रेरणा घेत हा उपक्रम घेतला आहे.यावेळी टिक्कल सर, गायकवाड सर,जाधव सर,पाटील सर,श्रीमती पंडित मॅडम,श्रीमती पगारे मॅडम,श्रीमती पाटील मॅडम, डॉ.सुजित सोनवणे,प्रदीप आगळे, रोहित कनगरे, स्वप्नील मंजुळ, विशाल गोर्डे, सतीश निकम,रविंद्र लचुरे, सागर राऊत,ऋषिकेश गायकवाड, पंकज कुऱ्हे, समाधान कुऱ्हे,आकाश मेहेर,अभी सूर्यवंशी आदींसह युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.