स्व.शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित श्रीराम कथा काल्याच्या कीर्तनाला भाविकांची उच्चांकी उपस्थिती

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आपल्या आजु-बाजुला निंदेचा कचरा टाकणा-यांची संख्या प्रचंड आहे, पण त्याकडे लक्ष न देता प्रत्येकांने जीवनांत उच्च ध्येय गाठावे. वाईट विकारावर अध्यात्मांने विजय मिळविता येतो दुखावलेल्या मनांला बरे करण्याचे काम अध्यात्माचे व्यासपिठ करते असे प्रतिपादन साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी केले.शहरातील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमीत्त कल्याणस्वामी संस्थान चकलंबा (गेवराई-बीड) अन्नपुर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका, साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या रसाळवाणीतुन संगीतमय प्रभु श्रीरामकथेचे आयोजन करण्यांत आले होते त्याची सांगता काल्याचे किर्तनांने रविवारी झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून महामंडलेश्वर काशिकानंद महाराज, रामानंदगिरी महाराज, बाळासाहेब रंजाळे महाराज, हभप रामदास महाराज रोहोम, विकासगिरी महाराज, जालींदर महाराज आदि संत महंतांचे पुजन करण्यांत केले.माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली महिला सक्षमीकरणांचे काम सुरू करत सर्वांना मदत केली. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी माणसुकीच्या भावनेतुन सामाजिक कामाची शिकवण दिल्यानेच राज्याच्या विधीमंडळात महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते पत्रकार सोमनाथ भगत व मृदुंगाचार्य भाविका भगतचा सत्कार करून तिला पाच हजार रूपयांचे बक्षिस दिले. महामंडलेश्वर काशिकानंद महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, कोल्हे परिवारांने श्रीरामकथेचे यशस्वी आयोजन करून कोपरगांवात पंढरीचा महिमा भरविला आहे.

स्व. शंकरराव कोल्हे तत्कालीन सहकारमंत्री असतांना त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही संत ज्ञानेश्वर शताब्दी सोहळा पाच हजार पारायणार्थीच्या उपस्थितीत साजरा केला होता. राजकारणाबरोबरच स्व. शंकरराव कोल्हे यांचा अध्यात्मावर देखील अभ्यास होता त्यांनी आम्हांस स्वतः संत तुकारामांच्या निवडक ७५ अभंगांचा चिकीत्सक अभ्यास करून ग्रंथ-पुस्तक दिले होते. ते स्पष्ट वक्ते होते. कामात त्यांचा आडपडदा नव्हता. देशाचे नेतृत्व खंबीर असेल तर ते सर्वांना बरोबर घेवुन चालते तद्वत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे सर्वांना बरोबर घेवुन विकास साधणारे नेतृत्व होते त्यांच्यामुळेच आज या परिसराचा मोठा कायापालट झालेला आहे. अध्यात्मात महिला म्हणून सोनालीदिदी कर्पे यांनी स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण करत स्त्रि शक्तीचा जागर उभा केला हा राज्याचा सन्मान आहे असे ते शेवटी म्हणाले.साध्वी सोनालीदिदी कर्पे पुढे म्हणाल्या की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांनी सात दशकाच्या सामाजिक राजकीय प्रवासात कोपरगांव पंचक्रोशीसह राज्याच्या विकासात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या दुस-या व तिस-या पिढीने त्यात अधिक भर घालत ज्ञान-दानाचा यज्ञ सुरू केला ही साधी गोष्ट नाही.

जगांने संत मिराबाईंवरही टिका केली पण त्या डगमगल्या नाही. निंदा करणं हा जगाचा स्वभाव आहे. जनता आपला अमुल्य हक्क चुकवतील पण टिका करण्याचा हक्क सोडणार नाही. टिकाकारांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना लक्ष करत त्यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न केला पण स्व. शंकरराव कोल्हे विकासाच्या मुददयापासुन तसुभरही हलले नाही म्हणूनच संजीवनी नावाचे साम्राज्य देश-विदेशात लौकीकास्पद आहे. कुठल्याही कामात चित्त महत्वाचे आहे ते लागल्याशिवाय कथेचा बोध होत नाही असे त्या म्हणाल्या. प्रमोद शरद पानगव्हाणे व रघुनाथ मारूती देवढे (पोहेगांव) यांनी किर्तनांत भालदार-चोपदारची भूमिका निभावली. लहान मुलींनी कमरेवर हात ठेवत ठुमकत ठुमकत अबाल वृद्ध महिला भाविकांनीही नाचण्याचा आनंद घेतला. अन्नपुर्णामाता वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलींमध्ये लयबध्द गमपधनीसा गायन जुगलबंदीची चढाओढ लागली होती. कसारा-मुंबई येथील सोमनाथ भगत यांनी काल्याची दहिहंडी नयनमनोहररित्या सजविली होती. मुख्य कार्यक्रम मंडपात महिलांना महाप्रसादासाठी ३८ तर माधवराव आढाव विद्यालय जुने सायन्स कॉलेज येथे पुरूषांसाठी ४८ लाईन आखण्यांत आल्या होत्या. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, संजीवनी युवा प्रतिष्ठान, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट, अमृत सुवर्णसंजीवनी, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांच्या स्वयंसेवकांकडुन दोन दिवस अगोदरच प्रसाद वाटपाचे नियोजनाची रंगीत तालीम करून घेण्यांत आली त्यामुळे हजारो भाविकांना जागेवर व्यवस्थतरित्या महाप्रसाद मिळाला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे स्वतः संपुर्ण परिस्थितीवर देखरेख करत होते. शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हजारो भाविकांनी याची देही याची डोळा श्रीरामकथेचा नयनमनोहर सोहळा अनुभवला. अवकाशात बहारदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.