वासुदेव देसले यांची डी.वाय.एस.पी पदी पदोन्नती

- संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची नुकतीच पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नतीने नाशिक ग्रामीण मधील पेठ त्रंबकेश्वर या विभागाचे पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे अहमदनगर जिल्ह्यामधील कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक पदी कर्तव्य बजावत असतांना गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम देसले साहेबांनी केले त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखणे व तळागाळात उपेक्षित लोकांना न्याय देण्याचे काम खऱ्या अर्थाने कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असताना नेहमीच गोरगरिबांना योग्य तो सल्ला व मार्गदर्शन केल्यामुळे अनेकांचे संसार आज गुण्यागोविंदाने आनंदात चालू आहे खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या पोलीस सर्विस मध्ये मध्ये नागपूर, धुळे, सोनगीर, भुसावळ, बसवंत पिंपळगाव, सटाणा, मालेगाव, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन व सध्या नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक पदी काम करत असतांना त्यांनी नेहमीच आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केल्यामुळे व आपल्या अनुभवाचा योग्य वेळी योग्य वापर केल्यामुळे ते यशस्वी ठरले खऱ्या अर्थाने शिर्डीच्या पावन भूमीमध्ये काम करत असतांना सदगुरू साईबाबांनी दिलेला श्रद्धा व सबुरीचा मंत्र नेहमीच अंगीकारल्यामुळे त्यांना लेट पण थेट त्यांच्या कामाची पोलीस प्रशासनाने दखल घेतल्यामुळे पदोन्नतीने ते सोमवारी पेठ त्रंबकेश्वर या विभागाच्या पोलीस उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत त्यांच्या पुढील कार्यासाठी महाराष्ट्र माझा न्युज टिमच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभकामना.