विद्यार्थी झाले व्यापारी ;छत्रपती शिवाजी विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात

कोळपेवाडी प्रतिनिधी- विशाल लोंढे
ग्रामीण भागातील विद्यार्थी आजच्या प्रगत विज्ञानवादी व व्यावसायिक स्पर्धेत टिकला पाहिजे, यासाठी त्याच्यातील व्यवहार ज्ञानाचा विकास होणे आवश्यक आहे, हे ओळखून तालुक्यातील सुरेगाव गौतमनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात “बाल आनंद मेळावा” आयोजित करण्यात आला होता.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यांसमोर ठेवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात हे विद्यालय नेहमीच अग्रेसर असते. मेळाव्यात विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी वडापाव, पाणीपुरी, भेळ,भाजीपाल्याची छोटी-मोठी दुकानं लावली होती. मनोरंजनाचे खेळ आदी गोष्टी या बाल आनंद मेळाव्यात आयोजित करण्यात आले होते.शालेय स्कुल कमिटीचे अध्यक्ष कचरू कोळपे यांनी आजची बदलेली शिक्षण प्रणाली व आपली जबाबदारी या संदर्भात मार्गदर्शन करताना शाळा ही आदर्श नागरिक घडवणारी प्रयोगशाळा असल्याचे सांगितले.गुरूंकल प्रकल्पाचे उपाध्यक्ष सुधीर निंबाळकर आपल्या भाषणात शाळा, विद्यार्थी आणि त्यांचा सर्वांगीण विकास या बद्दल मत व्यक्त केली.या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मुळा, मेथी,पेरू, मिरची, चिंचा, मसाला दूध, चहा, वडापाव,,भजी, पाव भाजी, भेळ, गुलाबजामुन, पुरीभाजी, कच्छी दाबेली, तसेच अनेक घरुपयोगी पदार्थ विक्रीसाठी आणले होते. या मेळाव्यात हजारो रुपयाची उलाढाल केली याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू कोळपे, गुरुकुल प्रकल्प उपाध्यक्ष सुधीर निंबाळकर, पत्रकार विशाल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते सतिश नरोडे,पर्यवेक्षक सानप सर, घोटेकर सर, आगवान सर आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश सावळा यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सांस्कृतीक विभाग प्रमुख गांगुर्डे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजा मुराद शेख यांनी केले आजन मेहेरे सर यांचे सहकार्य लाभले आहे.