संजीवनी फार्मसी महाविद्यालयाला महाराष्ट्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संशोधन कार्यास रू २६.५४ लाखांचा निधी मंजुर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी फार्मसी महाविद्यालय औषध निर्माण कार्यात नेहमीच भाग घेवुन आत्तापर्यंत अनेक असे प्रकल्प यशस्वी करून दाखविले आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आरजीएसटीसी) कडे ‘मॅग्नेटिक लिपोझोमल एरोसोल ( एमएलए) ऑफ इटोपोसाईड’ या लंग कॅन्सर उपचारासाठी परीणामकारक व सर्वसामान्यांना परवडेल अशा औषधाचा संशोधन प्रकल्प सादर केला होता.
नाविन्यपुर्ण कल्पना, संशोधन क्षमता, औषधाची समाजाच्या दृष्टीने उपयुक्तता आणि किफायत मुल्य, येथील औषदनिर्माण शास्त्रातील पदव्युतर पदवी व पीएच. डी. चे संशोधन प्रकल्पांचा दर्जा, इत्यादी बाबींचा आरजीएसटीसीने परवानगी बाबत विचार केला. तसेच यापुर्वी महाविद्यालयाने आखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषद, नवी दिल्ली, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, बायोटेक्नॉलॉजी विभाग, भारत सरकार, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ (बीसीयुडी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी पुर्वी दिलेल्या संशोधन निधीचा व संबंधित संशोधन प्रकल्प पुर्ण केल्याचे अहवालही आरजीएसटीसीने विचाराधिन घेतले. तसेच संजीवनी फार्मसी महाविद्यालयाला भारत सरकारच्या डीपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे ‘संशोधन आणि सल्लागार’ ही कामे करण्याचे अधिकृत प्रमाणपत्र आहे. या सर्व बाबींमुळे संजीवनी फार्मसी महाविद्यालय आरजीएसटीसीच्या सर्व निकषांमध्ये उतरले आणि महाविद्यालयास तीन वर्षाच्या संशोधन कार्यास रू २६. ५४ लाखांचा निधी मंजुर केला.- अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
त्यास आरजीएसटीसीने विविध निकषांच्या आधारे पडताळणी करून मान्यता दिली आहे व या संशोधन कार्यास रू २६.५४ लाखांचा निधी मंजुर केला आहे, अशी माहिती संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की राज्यातील नामांकित फार्मसी संस्थानी एकुण ५४ संशोधन प्रकल्प आरजीएसटीसीकडे सादर करण्यात आले होते. यात संजीवनीसह ५ ऑटोनॉमस संस्थांचा समावेश होता.

परंतु फार थोडे प्रकल्प मंजुर झाले आणि त्यात संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचा प्रकल्प मंजुर झाला ही बाब संजीवनी ग्रामीण भागात असुनही संशोधन कार्यात पुढे आहे, हे या उपलब्धीने अधोरेखित झाले आहे. हे संशोधन कार्य महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. विपुल पटेल हे प्रिंसिपल इन्व्हेस्टीगेटर (मुख्य अन्वेषक) म्हणुन काम करणार आहे तर प्रा. सुप्रिया भागवत या सह अन्वेषक म्हणुन कार्य करणार आहे.संजीवनी फार्मसी महाविद्यालयाच्या या यशाबध्दल संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी डॉ.विपुल पटेल यांचे अभिनंदन केले तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी त्यांचा सत्कार करून आरजीएसटीसीचे अधिकृत पत्र बहाल केले.