कोल्हे गटाच्या ठेकेदाराकडून प्रभागातील नागरीकांना दमबाजी करून मारहाण कोपरगाव शहर राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध –इम्तियाज अत्तार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
प्रभाग क्र.०७ मध्ये सुरु असलेल्या गटारीच्या कामाबाबत प्रभागातील नागरीकांनी संबंधीत ठेकेदाराला विचारलेली माहिती तर त्या ठेकेदाराने सांगितली नाहीच. मात्र आपला भाऊ नगरसेवक असल्याचा तोरा मिरवत कोल्हे गटाचा माजी नगरसेवक आरिफ कुरेशी यांच्या ठेकेदार असलेला भाऊ जुनेद कुरेशी याने नागरिकांना दमबाजी करत मारहाण केल्याची घटना कोपरगाव शहरात घडली आहे. सदरच्या घटनेचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष इम्तियाज अत्तार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.दिलेल्या प्रसिद्धी पत्रात इम्तियाज अत्तार यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असून मतदार संघातील गावांबरोबरच कोपरगाव शहरात देखील रस्ते, गटारी, शहर सुशोभिकरण अशी नागरीकांना अपेक्षित असलेली विविध विकास कामे सुरु आहेत.

कोपरगाव शहरातील अनेक विकास कामांचे ठेकेदार बहुतांश कोल्हे गटाचेच आहेत. परंतु ठेकेदार कोणत्या गटाचे आहेत याचे नागरीकांना काही देणे घेणे नाही. त्यांना आ. आशुतोष काळे यांनी आणलेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार होणे एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे आणि तो त्यांचा अधिकार देखील आहे. त्यामुळे कोणत्याही नागरीकाला सुरु असलेल्या विकास कामांबाबत संबंधित ठेकेदाराला आपल्या शंका विचारणे तो त्यांचा हक्क आहे व त्या ठेकेदाराने नागरीकांचे समाधान करणे हि त्या ठेकेदाराची नैतिक जबाबदारी आहे.मात्र कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ०७ मध्ये सुरु असलेल्या गटारीच्या कामाबाबत नागरीकांनी गटारीच्या कामाचा ठेकेदार असलेल्या कोल्हे गटाचा माजी नगरसेवक आरिफ कुरेशी यांच्या ठेकेदार असलेल्या जुनेद कुरेशी याला माहिती विचारली. त्यावेळी या महाशयांनी त्या नागरीकांना उद्धटपणे उत्तरे देवून माझा भाऊ या प्रभागाचा नगरसेवक होता तुझा काय संबंध माहिती विचारायचा? आम्ही कामे करू नाही तर थांबवू तुम्ही कोण आम्हाला विचारणारे अशा प्रकारे दमदाटी करुणा त्यांना मारहाण केली.

हा प्रकार निंदनीय असून समस्त कोपरगावकरांच्या वतीने अशा प्रवृत्तींचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीतून लवकरात लवकर विकास कामे पूर्ण व्हावी अशी नागरीकांची अपेक्षा असतांना बहुतांश कोल्हे गटाचे ठेकेदार असलेल्या ठेकेदारांची विकासकामे बंद ठेवण्याची भाषा कोपरगाव शहर विकासात अडथळा निर्माण करणारी आहे.कोपरगाव शहरात विकास कामे घेतलेल्या ठेकेदारांनी आपली कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात. मात्र अशा पद्धतीने कोपरगाव शहराच्या नागरीकांना वागणूक देणाऱ्या ठेकेदारांना जशास तशी वागणूक देवून उत्तराला उत्तर आम्हाला पण देता येते असे इम्तियाज अत्तार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात शेवटी म्हटले आहे.