गोदावरी पेट्रोल पंप ते टाकळी नाका पेव्हिंग ब्लॉकचे काम सुरु नागरिकांनी मानले आ.आशुतोष काळेंचे आभार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील प्रभाग क्र.०२ मधील रस्त्याचे काम पूर्ण होवून पेव्हिंग ब्लॉकचे काम मात्र रखडले होते. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या सूचनेवरून गोदावरी पेट्रोल पंप ते टाकळी नाका या मार्गावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरु झाले आहे. त्याबद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त करून आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

प्रभाग क्र.०२ मधील नागरीकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या गोदावरी पेट्रोल पंप ते टाकळी नाका या रस्त्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे जिल्हा नियोजन योजनेतून काम पूर्ण झाले होते. परंतु रस्त्याच्या बाजूने मार्गावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम मात्र रखडले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष डॉ.अनिरुद्ध काळे यांनी नागरीकांना येत असलेल्या अडचणी आ.आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या होत्या. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना करून तातडीने पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार सोमवार (दि.१५) पासून गोदावरी पेट्रोल पंप ते टाकळी नाका रस्त्यालगत पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांना येणाऱ्या अडचणी दूर होवून शहर सुशोभीकरणात देखील भर पडणार आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. याप्रसंगी जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव, बाळासाहेब आढाव, सोमनाथ आढाव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष डॉ.अनिरुद्ध काळे कार्तिक सरदार, महेश गोसावी, संदीप सावतडकर,रुपेश वाकचौरे, कार्तिक सरदार, संतोष शेजवळ, राजेंद्र पाखले, योगेश वाणी, राजेंद्र बोरावके,विलास ताम्हाणे, विजय बागडे, राहुल हंसवाल, शशिकांत शेळके, रोहित पटेल, राहुल जाधव, बंडू सरोदे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.