आ.आशुतोष काळेंच्या हस्ते नवीन चर्चच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
माझ्या पाठीशी कोपरगाव मतदार संघातील सर्व समाज बांधवांचे आशीर्वाद आहेत. प्रत्येक समाजाच्या अडी अडचणी प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य आहे. मतदार संघातील प्रत्येक समाजाच्या मागणीनुसार त्या त्या समाजाच्या सभागृहासाठी निधी दिलेला आहे. त्याप्रमाणे काकडीच्या ख्रिश्चन बांधवांनी देखील नवीन चर्च साठी सभामंडपाची केलेली मागणी लवकरच पूर्ण करण्यात येवून सभामंडपासाठी निधी देवू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.कोपरगाव मतदार संघातील काकडी येथे ४३ वा मतमाऊली नोव्हेना सप्ताह निमित्त राहाता येथील धर्मग्रामचे धर्मगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन चर्चच्या इमारतीचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,

ख्रिश्चन समाज हा भारतात एक शांतताप्रिय, शिक्षणप्रेमी व समाजसेवेला समर्पित असा समाज मानला जातो. शिक्षण, आरोग्य व सामाजिक सेवा क्षेत्रात ख्रिश्चन समाजाचे मोलाचे योगदान आहे.चर्च म्हणजे केवळ प्रार्थनेचे स्थान नसून ते एक सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. जिथे अनेक उपक्रम, चर्चासत्रं, आणि समाजहिताचे निर्णय घेतले जातात. अशा ठिकाणी सभामंडपासाठी केलेली मागणी रास्त असून मी लवकरात लवकर त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देईन. सभामंडप म्हणजे संवाद, एकता, आणि संस्कृती जोपासण्याचं ठिकाण आहे. प्रत्येक समाजाला हे हक्काने मिळालं पाहिजे. माझ्या दृष्टीने हे केवळ निधी वाटप नव्हे, तर सामाजिक सलोखा टिकवण्याचं आणि सौहार्द वाढवण्याचं एक पाऊल असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
आ.आशुतोष काळे यांनी आमची मागणी मान्य करून केलेली सहकार्याची भूमिका समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारी आहे. त्यामुळे स्थानिक ख्रिश्चन बांधवांमध्ये आनंद व समाधानाची भावना आहे. चर्च सभामंडपाच्या माध्यमातून धार्मिक उपासना, सामाजिक कार्यक्रम आणि युवकांसाठी कार्यशाळा व शिबिरे आयोजित करण्यास मदत होणार आहे त्याबद्दल ख्रिश्चन समाज बांधवांच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचे आभार. सर्व समाजांसाठी समान न्याय व समान विकास या भूमिकेचा वारसा आ.आशुतोष काळे पुढे नेत असून ते सर्व धर्मांना समान मानणारे खरे नेते आहेत.-पावलस सोनवणे
याप्रसंगी फादर प्रमोद बोधक, जॉन गुलदेव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविण शिंदे, भाऊपाटील गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, शंकरराव दिघे, सुभाष सोनवणे, कानिफनाथ गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ, मधुकर गुंजाळ, पावलस सोनवणे, रघुनाथ सोनवणे, विजय सोनवणे, अजित सोनवणे, संदीप सोनवणे, संतोष सोनवणे, बाळासाहेब मोरे, विकास सोनवणे, रविंद्र गुंजाळ, सचिन सोनवणे, भाऊसाहेब मोरे आदींसह समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.