संजीवनी युवा प्रतिष्ठानची गंगा गोदावरी महाआरती कार्यकारणी जाहीर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगावातील धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा प्रतीक ठरलेली गंगा-गोदावरी महाआरती यंदाही पवित्र श्रावणी सोमवारनिमित्त भव्य स्वरूपात आयोजित होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाआरतीच्या आयोजनासंदर्भात नियोजनात्मक बैठकीचे आयोजन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. या बैठकीत आगामी महाआरतीसाठी व्यापक नियोजन, जबाबदाऱ्या आणि युवा सहभागाची दिशा निश्चित करण्यात आली.बैठकीची सुरुवात ज्येष्ठ नेते डी.आर. काले यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी युवासेवकांशी संवाद साधत मागील वर्षांच्या यशस्वी आयोजनाचे स्मरण करत, यंदाही अधिक व्यापक पातळीवर महाआरतीचे आयोजन करण्याचे आवाहन केले.या बैठकीत २०२५ च्या गंगा-गोदावरी महाआरती समितीची रचना करण्यात आली.

समितीत पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.अध्यक्ष – रवींद्र रामलाल लचुरे,उपाध्यक्ष – अशोक हनुमंत नायकुडे,सचिव-प्रतीक संपत रोहम,खजिनदार-सौरभ दत्तात्रय होते,व्यवस्था प्रमुख-रोहित विष्णू होन,प्रचार प्रसार प्रमुख-रोहित दत्तात्रय उगलमुगले,कार्यक्रम प्रमुख-राहुल दिगंबर आढाव या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि आगामी जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.बैठकीस शेकडो उत्साही युवा सेवक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने कार्यक्रम यशस्वी करण्याची ग्वाही दिली. विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनात आरती कार्यक्रमाचे नियोजन, प्रसार, लोकसहभाग, स्वच्छता, सुरक्षाव्यवस्था आदींची विभागणी करण्यात आली.यावेळी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला. देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून देशभक्तीचा संदेश देण्यात आला.गंगा-गोदावरी महाआरती हा केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकात्मतेचा दीपप्रज्वलन करणारा उपक्रम ठरत आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम युवकांच्या सहभागातून अधिक भव्य, भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी स्वरूपात साजरा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.