शहर विकासाच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे एक कोटीच्या व्यापारी संकुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध – मंदार पहाडे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहराला प्रगतीची नवी दिशा दाखवणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात विकास कामांबरोबरच व्यापारी संकुल उभारण्यावर भर देवून व्यापार विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यापूर्वी कोपरगाव बस स्थानाकाच्या लगत सुरु असलेल्या व्यापारी संकुलाचे काम अंतिम टप्याकडे जात असतांना नुकतेच कोपरगाव नगरपरिषदेच्या लगत साडे तीन कोटीच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून शहर विकासाच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे टाकले असून एक कोटीच्या व्यापारी संकुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असल्याची माहिती माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी दिली आहे. राज्य शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील आरक्षण क्रमांक २९ मधील बाजारतळ येथील कोपरगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर एक कोटी रुपये निधीतून व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.

या व्यापारी संकुलाच्या कामासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यातून हि निविदा प्रसिद्ध झाली याचा कोपरगावकरांना आनंद झाला आहे. हे व्यापारी संकुल केवळ एक इमारत नसून, कोपरगाव शहराच्या व्यापारी वर्गासाठी नव्या युगाची सुरुवात आहे. आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेले हे संकुल व्यापाऱ्यांसाठी एक सुसज्ज व्यासपीठ ठरणार आहे. व्यवसाय-वाढ, सुव्यवस्थित व्यवहार आणि आर्थिक चैतन्य यासाठी हे व्यापारी संकुल एक आदर्श ठिकाण ठरणार आहे. आ.आशुतोष काळे यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी, विकासासाठी आणि शहराच्या सौंदर्यवर्धनासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक व्यापाराला नवे बळ मिळणार आहे. “हे फक्त एक व्यापारी संकुल नाही, तर हे नव्या कोपरगावच्या उभारणीसाठीचे पायाभूत पाऊल आहे. हे व्यापारी संकुल म्हणजे कोपरगावच्या व्यापार, सुविधा आणि शहरी विकासाच्या दिशेने टाकलेले एक भव्य पाऊल आहे. या उपक्रमामुळे आ.आशुतोष काळेंच्या नेतृत्वात कोपरगाव शहर नव्या उंचीवर पोहचणार असल्याचे मंदार पहाडे यांनी म्हटले आहे.