संजीवनी युनिव्हर्सिटीत कॉमर्स, एमबीए, सायन्स व फार्मसी प्रथम वर्ष विद्यार्थी व पालकांचे स्वागत

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
केवळ नोकरी मिळण्यासाठीच न शिकता करीअर करण्यासाठी शिका . विविध प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करा, परमेश्वर त्याचे फळ देईल. स्वतःला ओळखा आणि ध्येयाकडे जाण्याचा निर्धार करा. रोज काही तरी नविन शिका , नाही शिकले तर तो दिवस व्यर्थ गेल्या सारखा असेल. उद्याचा समर्थ भारत घडविण्याची जबाबदारी तरूणांची आहे, यासाठी नवीन आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करा, असे प्रतिपादन टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीच्या अकॅडमिक अलायन्स ग्रुपचे ग्लोबल हेड आणि एआय तज्ञ डॉ.के. एम. सुचींद्रन यांनी केले.संजीवनी युनिव्हर्सिटी संचलित स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, स्कूल ऑफ सायन्सेस व स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस मध्ये नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या स्वागत समारंभात डॉ. सुचींद्रन प्रमुख पाहुणे म्हणुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी स्वागत समारंभाचे अध्यक्षस्थान भुषविले. सदर प्रसंगी व्हाईस चांसलर डॉ.ए. जी. ठाकुर, व्हाईस प्रेसिडेंट-कार्पोरेट रिलेशन्स इम्राण शेख, डीन्स डॉ. कविथा राणी, डॉ. विनोद मालकर, डॉ. समाधान दहिकर, डॉ. सरीता पवार, रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे, विभाग प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संजीवनी युनिव्हर्सिटी व टीसीएस कंपनीमध्ये झालेल्या परस्पर सामंजस्य कराराचे दस्तावेज परस्परांना हस्तांतरीत करण्यात आले.प्रारंभी डॉ. मालकर यांनी सर्वाचे स्वागत करून संजीवनीच्या लोकल टू ग्लोबल गरूडझेप बाबत माहिती देवुन संजीवनीने स्थापित केलेल्या वेगवेगळ्या कीर्तिमानांची माहिती दिली.डॉ. सुचींद्रन उत्तम करीअरच्या प्रवासाचे वर्णन करताना पुढे म्हणाले की विद्यार्थी प्रथम शिक्षण संस्थेत शिक्षण घेतो.

हे करत असताना आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी काय कमी आहे, ते आत्मसात केले पाहीजे. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. उद्योेगाला तयार मनुष्यबळाची गरज असते. त्यानुसार केवळ नोकरीसाठी नव्हे तर आपल्या करीअरसाठी सज्ज व्हा. तसेच आपल्या ज्ञानाचा आणि विविध कौशल्यांचा भक्कम पाया तयार करा.डॉ.ठाकुर म्हणाले की जगाबरोबर राहण्यासाठी नविन तंत्रज्ञान आत्मसात करा. संजीवनी युनिव्हर्सिटी जरी ग्रामीण भागात असली तरी संजीवनीचे माजी विद्यार्थी जगभर मोठ्या पदांवर आहे. संजीवनी कोणत्या क्षेचत्रात मागे नाही, हे संजीवनीने अनेकदा सिध्द केले.विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाठी पालकांनी सजग राहुन सहकार्य करावे. विद्यार्थ्यांनी एखाद्या वेळी अपयश आले तर खचुन न जाता पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे . प्रत्येक स्पर्धेत सहभाग नोंदवा. त्यातुन जीवनाची मुल्ये व नेतृत्वगुणांची जोपासना होते. आगामी नवु दहा वर्षाच्या कालखंडात आपण कोठे असलो पाहीजे, याचे नियोजन करा.अध्यक्ष स्थानावरून बोलताना अमित कोल्हे म्हणाले की संजीवनी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी १९८३ साली शैक्षणिक संस्था सुरू करू शकले असते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून स्वावलंबी झाले पाहीजे, ही त्यांची तळमळ होती. त्यांच तळमळीने संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली संजीवनीची वाटचाल चालू आहे. सक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक सक्षम असावे लागतात, यासाठी त्यांना कायम नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी टीसीएसची मोठी मदत होते. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या २०४७ मधिल विकसीत भारताच्या संकल्पनेत सध्याच्या पिढीची भुमिका महत्वाची असणार आहे. भविष्यात उत्तम करीअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी येथे शिकविल्या जाणाऱ्या फ्रेंच, कोरीयन, जर्मन आणि जापनीज भाषा शिकाव्यात , असे आवाहन कोल्हे यांनी केले.प्रा.ढाकणे यांनी आभार मानले.