गौतम पब्लिक स्कूल मध्ये सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेस उत्साहात सुरुवात

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गौतमनगर कोळपेवाडी येथे गौतम पब्लिक स्कूलच्या फुटबॉल स्टेडियमवर सोमवारी सुब्रतो मुखर्जी स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले.नॉकआउट पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील १७ वर्षांखालील मुलांचे २५ संघ, मुलींच्या गटात ४ संघ आणि १५ वर्षांखालील मुलांच्या २० संघांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना मा.आ.अशोकराव काळे म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील ही पहिली क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक ठरेल.गौतम पब्लिक स्कूल मध्ये अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना मैदानी खेळात देखील निपुण करण्यात येते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व खेळांचे योग्य मार्गदर्शन मिळावे व विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडवावे याकडे शाळा व्यवस्थापनाचे बारीक लक्ष असते. शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नातून गौतम पब्लिक स्कूलने अनेक खेळाडू घडविले असून या खेळाडूंनी आपली वेगळी ओळख निर्माण करून गौतम पब्लिक स्कूलचा देखील नावलौकिक उंचावला आहे.

भविष्यात असेच अनेक गुणवान खेळाडू घडले जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला व स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंना उत्कृष्ट खेळासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी शाळेचे प्राचार्य नूर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे विविध अधिकारी, शाळेचा क्रीडा विभाग, जिल्ह्यातील विविध शाळेतील नामांकित फुटबॉल प्रशिक्षक, संघातील खेळाडू, शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने हजर होते.विभागीय पातळीवरील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर दिनांक २१, २२ व २३ जुलै २०२५ दरम्यान होणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी यावेळी दिली.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, अहिल्यानगर व प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे क्रीडा संचालक व फुटबॉल प्रशिक्षक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, शाळेच्या पर्यवेक्षिका ज्योती शेलार सर्व. हाऊस मास्टर्स मेहनत घेत आहेत.