माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली -गिलबिले

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सहकार हा जागाचा आत्मा आहे. सहकारातुन अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या, विकासरूपी संस्था उभ्या राहिल्या, परमेश्वरांने या भुतलावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या रूपाने सहकाराचा नांवलौकीक वाढविण्यांसाठी कर्मरत्न जन्माले घातले त्यातुन त्यांनी परिसराबरोबरच राज्याचे सहकारवैभव देशात नावारूपाला आणले असे प्रतिपादन व्यक्तीमत्व विकास केंद्राचे संस्थापक, अभियंते गोपी गिलबिले यांनी केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि त्यांचे पायलट प्रकल्प राज्यातील साखरकारखानदारीला आदर्शवत आहे असेही ते म्हणाले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमीत्त एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यांत आले होते त्याचे उदघाटन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रांरभी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी प्रास्तविकात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात कर्मचा-यांबरोबरच सर्व उस उत्पादक सभासद शेतक-यांच्या व्यक्तीमत्व विकासाकरीता राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे व साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.अध्यक्षपदावरून बोलतांना बिपीनदादा कोल्हे म्हणाले की, सभासद शेतक-यांबरोबरच छोट्या मोठ्या घटकांच्या उत्कर्षाचा मार्ग सहकारातुन जातो. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतले तरी येथील मातीशी असलेली नाळ कधी सोडली नाही. संजीवनी नावाचे वैभव त्यांनी उभे केले त्याची फळे आपण चाखतो आहे. भविष्यातील बदल, तंत्रज्ञान, प्रगलभता आणि त्यातुन नवनविन निर्माण होणारी आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी युवानेते विवेक कोल्हे व त्यांचे सर्व संचालक मंडळ कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी अनेक धोरणांत्मक निर्णय घेतले. आंतरराष्ट्रीय सहकारवर्षात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डिजीटलायझेशन संगणकीकरणासह नवनविन उद्योगातुन सहकाराच्या प्रगतीसाठी काय केले पाहिजे याची शिकवण देण्यांचे धोरण अवलंबिले आहे. गोपी गिलबिले पुढे म्हणाले की, संस्था आपल्यासाठी काम करते तेंव्हा तिच्या उत्कर्षासाठी कामगार या नात्यांने आपणही तितकेच योगदान दिले पाहिजे.

प्रत्येकामध्ये आत्मविश्वास आहे तो फक्त जागृत करा आणि संस्था स्वतःच्या बळावर पुढे नेण्यासाठी झोकुन देवुन काम करा. स्वतःमध्ये बदल घडवा. कामावर निष्ठा ठेवा. शालेयशिक्षणाबरोबरच जीवन शिक्षणाला महत्व द्या. योग्यता तयार होते. इतरांना दिसण्यासाठी एक आणि स्वतःसाठी एक असे वागु नका. जे कानांत आत्मसात केले तर मनांत उतरवा आणि तेच आचरणांत आणा. जगातील सर्वात मोठा गुरू अनुभव आहे. ज्याला आवड असते तो घडयाळाकडे कधीच बघत नाही. संकुचितपणा, नकारार्थी प्रश्न, मोजपाप, प्रवृत्ती, भीती, व्यक्तीमत्व, वेळेचे बंधन हया बाधा आणणा-या घटकापासुन स्वतःला वेगळे करा. रावण विद्वान, बलवान, धनवान होता पण त्याच्यातील प्रवृत्ती चांगल्या नव्हत्या म्हणूनच आपल्या मनांमधील संकुचित विचारांचे प्रत्येक विजयादशमीला दहन करा. आनंद आपल्यातच आहे तो शोधायचा प्रयत्न करा. जग बदलण्यापेक्षा आधी स्वतःला बदला. पैशांने मंदिरे बांधता येतात पण परमेश्वर घेता येत नाही. छोटया छोटया गोष्टीमध्ये समाधान आहे ते ओळखा आणि आपण जेथे काम करतो त्या संस्थेच्या प्रगतीसाठी उत्कर्षासाठी सतत कार्यमग्न रहा असेही ते म्हणांले.याप्रसंगी संचालक अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, ज्ञानदेव औताडे सर, बाळासाहेब वक्ते, सतिष आव्हाड, रमेश घोडेराव, ज्ञानेश्वर होन, बाळासाहेब पानगव्हाणे, संजयराव औताडे, ज्ञानेश्वर परजणे, मानव संसाधन विभाग प्रमुख विशाल वाजपेयी, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सचिव तुळशीराम कानवडे, यांच्यासह सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार, विविध संस्थांचे आजी माजी संचालक, पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले.