समता

व्यापारी महासंघाची मागणी लोकप्रतिनिधींनी विधानसभेत मांडावी – काका कोयटे, अध्यक्ष

0 6 0 0 2 4

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

भारतीय अर्थव्यवस्था सक्षम व सुदृढ बनवण्यात कोपरगाव तालुक्यातील व्यापारी वर्गाचा खारीचा वाटा नक्कीच आहे. अनेक समस्यांना सामोरे जात तालुक्यातील व्यापारी, छोटे – मोठे किराणा दुकानदार ग्राहकांना सेवा देऊन त्यांचा विश्वास मिळवत आहे. तालुक्यातील व्यापारी हा स्पर्धेच्या युगात स्पर्धा करायला तयार आहे. परंतु व्यापारी महासंघाच्या मागण्यांमधील प्रमुख मागणी असलेली ‘वन नेशन, वन वेट, वन रेट’ ही मागणी लोकप्रतिनिधींनी विधानसभेत मांडावी. तसेच विवेक कोल्हे यांनी देखील अमित शहांकडे आमची मागणी मांडावी.असे प्रतिपादन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केली.काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली २५ मे जागतिक व्यापारी दिनानिमित्त कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन, युवा व्यापारी आघाडी, महिला व्यापारी आघाडी, कोपरगाव तालुका डीलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य बाईक रॅली, ज्येष्ठ व्यापारी व नव उद्योजक सन्मान सोहळा आणि ग्राहक हक्क संरक्षण प्रबोधन कार्यक्रमात तालुक्यातील व्यापारी वर्गाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, नामदेवराव परजणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेशआबा परजणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.काका कोयटे पुढे म्हणाले की, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी जे सादरीकरण केले. ते कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी विधानसभेत मांडून ग्राहकांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारला ‘वन नेशन, वन वेट वन रेट’ कायदा करण्यास भाग पाडावे. तसेच कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी भागात होणाऱ्या एमआयडीसीत स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य द्यावे. त्या जागांमध्ये उद्योग उभारण्यासाठी व्यापारी महासंघ व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करील. समृद्धी महामार्गामुळे कोपरगाव ते मुंबई च्या प्रवास ३ तासावर येणार आहे. याचे सादरीकरण विधानसभेत लोकप्रतिनिधींनी करावे. त्याचा फायदा कोपरगावकरांना कसा करून देता येईल ? विशेषतः मुंबईचे व्यापारी व व्यापाऱ्यांकडील मुनिम कोपरगाव शहरात वास्तव्यास येण्यासाठी कोपरगाव कसे समृद्ध आहे ? कोपरगाव मध्ये त्यांची राहण्याची सोय चांगल्या पद्धतीने होऊ शकते ? या बाबींचा उल्लेख लोकप्रतिनिधींनी विधानसभेत मांडण्यात येणाऱ्या सादरीकरणांमध्ये प्रामुख्याने करावा.विशेषतः तालुक्यातील जेऊर कुंभारी, कोकमठाण या सारख्या ग्रामीण भागात कोपरगावातील बिल्डरांनी मोठ्या प्रमाणात वसाहती उभारल्या तर मुंबईचे व्यापारी देखील कोपरगावला राहण्यासाठी येण्यास उत्सुक होतील. त्या दृष्टीने देखील कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी प्रयत्न करावे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व तालुक्याचे आमदार आशुतोष काळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोपरगाव शहर व तालुका विकासात व्यापारी महासंघ नेहमीच अग्रभागी आहे. त्यांचे उपक्रम हे नेहमीच व्यापारी व ग्राहकांच्या हिताचे असतात. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यामध्ये मी देखील प्रामाणिकपणे प्रयत्न करून होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात व्यापारी महासंघाच्या मागण्या संदर्भात आवाज उठवेल. विशेषतः ‘वन नेशन, वन रेट, वन वेट’ या संकल्पने चे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल.तालुक्यातील व्यापाऱ्यांच्या भव्य दिव्य स्वरूपाच्या बाईक रॅलीमध्ये २७० व्यापारी सहभागी झाले होते. या रॅलीत व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी महासंघाचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देत कोपरगाव तालुक्यातील व्यापारी एकजुटीचे दर्शन घडविण्यात आले. शहरातील व्यापारी प्रमोद मुंदडा यांनी ‘व्यापारी महासंघाचा एकच ध्यास, गावाचा विकास’ अशा प्रकारचे गीत तयार करून बाईक रॅलीमध्ये या गीतामुळे एक जान आली होती. सर्व व्यापाऱ्यांमध्ये उत्साह पसरला होता. कोपरगाव तालुक्याची ओळख कॅलिफोर्निया अशी करण्यात ज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले अशा १९ ज्येष्ठ व्यापाऱ्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कोपरगाव तालुक्याची बाजारपेठ हलविण्यात जे महत्त्वपूर्ण योगदान देत आहे अशा ०९ नव उद्योजकांना कर्तृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित केले.

जाहिरात
जाहिरात

जीवन गौरव प्राप्त ज्येष्ठ व्यापारी टेकचंद खुबानी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, व्यापारी महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे आम्ही भारावून गेलो आहे. आमचा आयुष्यभर सन्मान केला गेला नाही, परंतु व्यापारी म्हणून जो जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला याचा आम्हाला अभिमान आहे. यामुळे आमच्या कुटुंबियांचे देखील डोळे पाणवलेले आहेत.तसेच ऑनलाइन ऑफलाइन यातील फरक कमी करण्यासाठी तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी समता नागरी सहकारी पतसंस्थे द्वारा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून ‘सहकार बास्केट’ या ऑनलाइन ॲपचे उद्घाटन आणि व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या कार्याची माहिती व मागण्यांचे निवेदन देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. कोपरगाव तालुका व्यापारी महिला आघाडी च्या अध्यक्षपदी राजश्री ताई गुजराथी यांची निवड करण्यात आली असून प्रसंगी माजी अध्यक्षा किरण दगडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धेच्या युगात व्यापार वाढीसाठी अमुलाग्र बदल होण्यासाठी ग्राहक हक्क संरक्षण व प्रबोधन करत ‘वन नेशन, वन वेट, वन रेट’ संकल्पना, ऑनलाइन खरेदीत होणारी ग्राहकांची फसवणूक याबाबत चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण करत मार्गदर्शन केले. व्यापारी युवा आघाडीचे हर्षल कृष्णानी यांनी देखील चित्रफितीच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक कशाप्रकारे होते ? यावर प्रकाश टाकला.सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी चित्रफितीच्या माध्यमातून जे सादरीकरण केले ते वाखणण्याजोगे असून ते ग्राहकांसमोर देखील करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे ग्राहक संरक्षण व जागृता मोठ्या प्रमाणात होईल. व्यापारी महासंघाचे उपक्रम, कार्यक्रम ग्राहक हिताचे असल्यामुळे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला अच्छे दिन येत आहे. त्यात अजून भर घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील विधानसभेत आवाज उठविणे महत्त्वाचे आहे.व्यापारी महासंघ ग्राहक सेवा हाच धर्म मानून ग्राहकांना येणाऱ्या अडचणी देखील सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. कोपरगाव शहरात महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे कमी आहेत ती वाढवावी. ज्या जागेवरून अतिक्रमण उठले आहे त्या जागेवर स्वच्छतागृहे व पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. अशी मागणी कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब यांनी प्रास्ताविकातून केली.जीवन गौरव प्राप्त ज्येष्ठ व्यापाऱ्यांचा परिचय करून देत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यापारी महासंघ सचिव प्रदीप साखरे यांनी केले. या वेळी व्यापारी महासंघ कोषाध्यक्ष तुलसीदास खुबानी, कार्याध्यक्ष अजित लोहाडे, ज्येष्ठ संचालक आशुतोष पटवर्धन, नारायणशेठ अग्रवाल, केशवराव भवर, रमेश शिरोडे, विजय नानकर आदींसह तालुक्यातील व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक महावीर सोनी, नारायण लांडगे, मानव शुक्ला, प्रीतम बंब, संदीप काबरा, किरण शिरोडे, उल्हास गवारे, संतोष गंगवाल, अतिश शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार युवा व्यापारी आघाडीचे धीरज कराचीवाला यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 0 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे