कोपरगाव शिर्डी औद्योगीक वसाहतीसाठी मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे प्रशिक्षण केंद्राची मागणी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी – शिर्डी येथे औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष मागणी केली आहे. यामध्ये एमआयडीसी केंद्रात सेंटर फॉर इव्हेशन, इनोव्हेशन आणि इक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर उभारण्याची विनंती केली आहे.शिर्डी परिसरात औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण असून, सध्या अनेक नामांकित औद्योगिक कंपन्यांनी येथे गुंतवणूकिस सुरुवात केली आहे. ‘डिफेन्स क्लस्टर’सारखा प्रकल्प राज्य शासनाने मंजूर केला आहे.भविष्यात येथे रोजगार निर्मितीची नवी दालने खुली होतील. या पार्श्वभूमीवर सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे सादर केलेल्या मागणीमध्ये म्हटले आहे की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युवकांना स्किल डेव्हलपमेंटसाठी आवश्यक प्रशिक्षण देणारे इक्युबेशन व ट्रेनिंग सेंटर उभारण्यात यावे यामुळे आर्टिफिशल इंटेलिजन्स (ए. आय.) सारख्या आधुनिक प्रशिक्षण मिळून कौशल्य वृद्धी होणार आहे.शिर्डीच्या जवळ विमानतळ, समृद्धी महामार्ग, उच्च दर्जाच्या प्रवास आणि निवास सुविधा आदींच्या सुविधांमुळे येथे देशी-विदेशी उद्योगांना आकर्षित करण्याची क्षमता आहे.

या औद्योगिक विकासामुळे केवळ रोजगारच नव्हे तर स्थानिक स्तरावरील व्यवसाय आणि उद्योग वृद्धिंगत होतील. एमआयडीसीच्या माध्यमातून शिर्डी आणि परिसरात एक प्रगत, स्मार्ट औद्योगिक हब उ राहण्याची संधी आहे.या पत्राद्वारे सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी शिर्डीसाठी मांडलेली ही मागणी फक्त विकासाचे नव्हे, तर आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरू शकते. गेल्यां चार महिन्यात राज्यात चार केंद्र मंजूर करण्यात आले आहे त्या धर्तीवर या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा.कोपरगाव तालुक्यातील व शिर्डी परिसराची ओळख नव्या औद्योगिक युगाचे प्रवेशद्वार ठरावे, हीच त्यामागची दूरदृष्टी आहे. राज्य सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.