संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे रोजगाराची सुवर्णसंधी – असंख्य युवक युवतींना रोजगार देणाऱ्या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोपरगाव तालुका व परिसरातील युवक-युवतींसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत पुणे येथील नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये (MNC) थेट भरतीची संधी निर्माण करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली आहे.या रोजगार मेळाव्याच्या आयोजनामागे युवानेते मा. विवेकभैय्या कोल्हे यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या प्रयत्नांतून आजवर हजारो युवकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या रोजगार उपक्रमांद्वारे स्थायिक नोकऱ्या मिळाल्या आहेत. या उपक्रमाद्वारे अनेक कुटुंबांचा आर्थिक कणा मजबूत केला आहे.या वेळीही पुणे येथील नामांकित कंपन्यांमध्ये डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E & TC) असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

वयाची अट १८ ते ३० वर्षांपर्यंत असून, एकत्रित पगार १९,००० ते २५,००० पर्यंत मिळणार आहे. डबल ओव्हरटाईम, ट्रान्सपोर्ट व कँटीन सुविधा देखील गरजेनुसार उपलब्ध करून दिली जाईल.रोजगार मेळाव्याची तारीख: २८ मे २०२५ असून वेळ: सकाळी ९:३० वाजता आहे तर ठिकाण: सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि., नवीन बिल्डिंग सभागृह,सहजानंदनगर, कोपरगाव येथे ठेवण्यात आले आहे.सर्व उमेदवारांनी QR कोड स्कॅन करून फॉर्म भरणे आवश्यक आहे. सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर ई-मेलवर पाठवण्यात येईल. मुलाखतीसाठी येताना शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणावीत.अधिक माहितीसाठी संपर्क करण्यासाठी 8181909090/8329214719 हे क्रमांक देण्यात आले आहेत.