संजीवनी सैनिकी स्कूलचा विक्रम जगताप एसएससी परीक्षेत ९५. ६० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतलेल्या इ.१० वीच्या परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन यांत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी सैनिकी स्कूलने आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात विक्रम सुरेश जगताप याने ९५. ६० टक्के गुण मिळवुन स्कूलमध्ये सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला. निखिल वाल्मिक गायकवाडने ९४. ८० टक्के गुण मिळवुन दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. सोहम सुदिप देशमुखने ९३. ४० टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकावर शिक्कामोर्तब केले. हितेश दादाजी पाटील व गणेश शरद कांगणे यांनी अनुक्रमे ९३. २० व ९२. ८० टक्के गुण मिळवुन चौथा व पाचवा क्रमांक मिळविला. एकुण ५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४४ विद्यार्थ्यांनी ८० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले, अशी माहिती स्कूलने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की हितेश पाटीलने गणित विषयात १०० पैकी १०० व सायन्स विषयात १०० पैकी ९८ गुण मिळविले.

विक्रम जगताप ने हिंदी विषयात ९४ तर इंग्रजी विषयात ९२ गुण मिळवुन विक्रम नोंदविला. सोहम जगतापने समाजशास्त्र विषयात १०० पैकी ९७ गुण मिळविले तर सत्यम संदिप वाघने मराठी विषयात १०० पैकी ९१ गुण मिळविले.संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ब्रास बॅन्ड स्पर्धा, विविध खेळ, सांस्कृतिक, विज्ञान प्रदर्शन , तांत्रिक स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, अशा प्रत्येक बाबतीत बक्षिसे मिळवुन आपली आघाडी सिध्द केली आहे. आता शैक्षणिक गुणवत्तेमध्ये १०० टक्के निकाल देवुन स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, प्राचार्य कैलास दरेकर व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.