संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा आर्यन नाकरा सीबीएसई परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) फेब्रवारी २०२५ मध्ये घेतलेल्या इ. १० वीच्या परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन यात शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रतिभावंतानी स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात आर्यन नाकराने ९५ टक्के गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडवत स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला. श्रुती भाऊराव गांगुर्डे ही ९४ टक्के गुण मिळवुन दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. जिया नरेश पारख हिने ९२ टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळविला. उत्कृष्ट निकालाने संजीवनी इंटरनॅशनल स्कूलने आपला शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा सिध्द केला आहे, असे संजीवनी इंटरनॅशनल स्कूलनेे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळ, सांस्कृतिक, विज्ञान प्रदर्शन , तांत्रिक स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, अशा प्रत्येक बाबतीत बक्षिसे मिळवुन आपली आघाडी सिध्द केली आहे. आता शैक्षणिक गुणवत्तेमध्ये १०० टक्के निकाल देवुन स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, प्रिंसिपल डायरेक्टर सुधा सुब्रमण्यम, प्राचार्या रिना रजपुत, हेड मिस्ट्रेस रेखा साळुंके, सर्व शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.