आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

काकडीत कोल्हे गटाला मोठा धक्का काकडीच्या सरपंच सौ.पूर्वा गुंजाळ व कानिफनाथ गुंजाळ काळे गटात

0 5 7 7 0 2

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुक्यातील काकडी गावच्या सरपंच सौ.पूर्वा गुंजाळ व कोल्हे गटाचे कट्टर कार्यकर्ते कानिफनाथ गुंजाळ यांनी नुकताच ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांसह काळे गटात प्रवेश केला आहे. आ.आशुतोष काळे यांनी सरपंच सरपंच सौ.पूर्वा गुंजाळ, कानिफनाथ गुंजाळ,त्यांच्या सहकारी सदस्यांचे व कार्यकर्त्यांचे काळे गटात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.काकडी गावच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळत असतांना काकडी गावचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास केला असून हा विकास करतांना आ.आशुतोष काळे यांची मोठी मदत झाली आहे.

आजवर सरपंचपदाच्या माध्यमातून काकडी गावाचा सर्वांगीण विकास एवढा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माझी वाटचाल सुरू होती. या वाटचालीत आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून आजवर काकडी गावाचा विकास करण्यासाठी मोलाची मदत झाली आहे व यापुढील काळातही होणार आहे यात शंका नाही.मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठेवून याहीपेक्षा जास्त विकास करण्यासाठी मी काळे गटात प्रवेश केला आहे.मला विश्वास आहे की,विकासाच्या बाबतीत नेहमीच सजग असणाऱ्या व जनतेच्या प्रश्नाची सखोल जाणीव असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांची साथ देवून काकडी गावाचा यापेक्षा अधिकचा विकास सहजपणे साधला जाणार आहे.-सरपंच सौ.पूर्वा गुंजाळ.

काकडी गावची पाणी पुरवठा योजना, वेस काकडी रस्ता,शाळा खोल्या,वीज रोहित्र, तसेच विमानतळाच्या माध्यमातून गावच्या समस्या सोडविण्यात त्यांचे सहकार्य लाभले असून गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून आवश्यक असलेला निधी आ.आशुतोष काळे यांनी देखील सढळ हाताने दिला आहे. पुढील विकासकामांसाठी विविध विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून लवकरच त्या विकास कामांना आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे. यापुढील काळातही काकडी गावाचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी सरपंच सौ.पूर्वा गुंजाळ व कोल्हे गटाचे कट्टर कार्यकर्ते कानिफनाथ गुंजाळ यांनी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे यावेळी सांगितले.

जाहिरात
जाहिरात

यावेळी सरपंच सौ.पूर्वा गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मोरे, अशोक सोनवणे, चंद्रकलाताई सोनवणे, साखरताई सोनवणे, गजानन सोनवणे, रविंद्र गुंजाळ व कानिफनाथ सोनवणे आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी प्रभाकर गुंजाळ नंदकिशोर ओताडे उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 7 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे