आत्मा मालिकची इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेत घवघवीत यश

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेत घवघवीत यश मिळवले. कुमारी वृंदा पंकज माळी व योगेश्वरी विशाल देशमुख या दोन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. इंडियन टॅलेंट ओलंपियाड ही परीक्षा देश पातळीवर गणित विज्ञान व इंग्रजी या विषयांसाठी घेण्यात येते या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विज्ञान ओलंपियाड मध्ये सुयश बंदगर व साहिल त्रिभुवन, इंग्रजी ओलंपियाड मध्ये नंदिनी पवार तर गणित ओलंपियाड परीक्षेत दिव्या जाधव यांची एक्सलन्स अवॉर्ड साठी निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना सत्कारावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हटले की, इयत्ता ७ वी पासून फाउंडेशनच्या वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब उपलब्ध करून दिल्यामुळे परीक्षांची डिजिटल कन्टेन्टच्या माध्यमातून अधिक तयारी करता येते तसेच पेपर सोडविण्याच्या सरावही जास्त होतो

त्यामुळे आत्मा मालिकचे विद्यार्थी सर्व स्पर्धा व शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन करत आहेत.या विद्यार्थ्यांना प्राचार्य नामदेव डांगे, पल्लवी भोंगळे, वैभव सोमासे, शिवाजी गाजरे, शिवम तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल आदींनी अभिनंदन केले.