युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठान, एस.एम.बी.टी. हॉस्पिटल आणि मुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मुळे हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे.प्रारंभी या उपक्रमाचे उद्घाटन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. बिपीनदादा कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडले. शिबिरामध्ये सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांची उपस्थिती लाभली. या शिबिरात डॉ. डी. एस. मुळे आणि डॉ. संकेत मुळे यांनी रुग्णांचे स्वागत केले.उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करताना डॉ. वर्मा यांनी सांगितले की, दैनंदिन जीवनशैली, आहार-विहार व शरीराला लागणाऱ्या सवयी या आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करत असतात. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वेळेवर तपासणी करणे गरजेचे आहे.त्यांनी रुग्णांची तपासणी करत त्यांना हृदयविकारासंबंधी आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्यांचे मार्गदर्शन केले.डॉ.मुळे यांनी उपस्थितांना हृदयविकाराची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी रुग्णांना वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येतात, याचे महत्त्व पटवून दिले.समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत भविष्यकालातही असे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.बिपीनदादा कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवार सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण आणि शेती क्षेत्रात नेहमीच सक्रिय भूमिका बजावत असतो.
या कार्यक्रमात पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यु पावलेल्या देशवासीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या उपक्रमाच्या निमित्ताने बिपीनदादा कोल्हे यांनी डॉ. वर्मा व डॉ. मुळे यांचे मनापासून कौतुक केले आणि सांगितले की, “रुग्णसेवेचा हा उपक्रम हे स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या ‘सेवा हाच धर्म’ या तत्वज्ञानाचेच प्रत्यक्ष रूप आहे. कोल्हे परिवार हा हाक येईल तिथे आरोग्यासाठी धावून जाणारा आहे ही आमची भूमिका असते.या मोफत तपासणी शिबिरामध्ये ईसीजी, बीपी, रक्तातील साखर तपासणी (शुगर), तसेच 2D इकोसारख्या आधुनिक तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात आल्या. या शिबिराचा लाभ घेत ३०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. हजारो रुपये खर्चिक असणाऱ्या या तपासण्या मोफत झाल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी यासाठी आयोजकांचे कौतुक केले.विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या मोफत तपासणी शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना हृदयविकारासंबंधी प्राथमिक निदानाची संधी मिळाली. हे शिबिर समाजासाठी आरोग्यदायी व प्रेरणादायी ठरले.यावेळी राजेंद्र झावरे, पराग संधान, रवीअण्णा पाठक, राजेंद्र सोनवणे, दत्ता काले, वैभव आढाव, विशाल गोर्डे, सुनील कदम, अक्षय मगर,कैलास जाधव, रोहित वाघ, नारायण शेठ अग्रवाल, प्रदीप नवले, जितेंद्र रणशूर, दीपक जपे, रवींद्र रोहमारे, कैलास खैरे, सुरेश बोळीज, योगेश जोबनपुत्रा, प्रसाद आढाव, सिद्धार्थ साठे, रोहित कणगरे, महेश कळमकर, दादा नाईकवाडे, राजेंद्र बागुल, गोपीनाथ गायकवाड, सतीश निकम, विवेक सोनवणे,सचिन सावंत, शामराव आहेर, अकबरलाला शेख, फकीर मोहम्मद पैलवान, खालीकभाई कुरेशी, शफिक सय्यद, मुकुंद उदावंत, सुशांत खैरे, सुरेश राऊत, सतीश रानडे, रवींद्र लचुरे, चंद्रकांत वाघमारे, रोहन दरपेल, सुजल चंदनशिव, गोरख देवडे, कैलास सोमासे, राजेंद्र गंगुले आदींसह तपासणीसाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.