संजीवनी पॉलीटेक्निकच्या चार अभियंत्यांची ब्ल्यु स्टार इंडिया कंपनीत नोकरीसाठी निवड

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ( टी अँड पी) विभागाच्या पूर्व तयारीने व संपर्काने अलिकडेच ब्लु स्टार इंडिया या घरगुती व आद्योगीक उपकरणे बनविणाऱ्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करून अंतिम वर्षातील चार नावोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांना ऊद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यात येते, त्याचे हे फलित आहे, यामुळे विद्यार्थी अनेक कंपन्यांच्या कसोटीत पात्र होत आहेत, अशी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिदी पत्रकाद्वारे दिली आहे.संजीवनी पॉलीटेक्निक मार्फत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या दुसऱ्या वर्षापासुनच त्यांना तीन पर्याय दिल्या जातात. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पुर्ण केल्यावर पहिला पर्याय म्हणजे नामांकीत कंपनित चांगल्या वार्षिक पॅकेजची नोकरी हवी आहे काय?,दुसरा पर्याय उच्च शिक्षणासाठी जायचे आहे काय?, आणि तिसरा पर्याय म्हणजे ऊद्योजक बनायचे आहे काय?. वरीलप्रमाणे विद्यार्थ्यांची वर्गवारी करून त्यांना प्रशिक्षित केल्या जाते.

याचा परीपाक म्हणुन नोकरी अपेक्षित असलेल्या विद्यार्थ्यांना कंपनी निहाय अधिकचे प्रशिक्षण दिल्या जाते व वेगवेळया कंपन्या या टी अँड पी विभागाने केलेल्या समन्वयानुसार संस्थेत कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करतात.यानुसार अलिकडेच ब्लु स्टार इंडिया कंपनीने घेतलेल्या कॅम्पस मुलाखतींमध्ये अंतिम वर्षातील मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या लकी रामदास शेलार, क्रिष्णा संजय आसणे, तुषार आबासाहेब वायसे व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या गौरव अरूण पांडे यांची नोकरीसाठी निवड केली.संजीवनीचे अध्यक्ष नितिनादादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व झालेल्या नवोदित अभियंत्यांच्या व पालकांचे अभिनंदन करून नवोदित अंभियंत्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्दा दिल्या. प्राचार्य ए. आर. मिरीकर व टी अँड पी प्रमुख प्रा. आय. के. सय्यद यांचेही अभिनंदन केले.