संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे मोफत फिरता दवाखान्याच्या माध्यमातून नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नगरपालिका कार्यालय येथे हे शिबिर पार पडले यात शेकडो कर्मचारी बंधू भगिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली.या आरोग्य शिबिरात स्वच्छता कर्मचाऱ्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले तसेच गरजेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य सशक्त राहावे व त्यांच्या कुटुंबीयांचीही काळजी घेता यावी, या हेतूने या शिबिराचे आयोजन केले गेले होते. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागृती वाढली असून, त्यांच्या आरोग्य संरक्षक धोरणाला बळकटी मिळाली आहे.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, डी.आर. काले, वैभव आढाव, रवीअण्णा पाठक, खालिक भाई कुरेशी, रोहित कनगरे यांची उपस्थिती होती.

यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप, उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल, कार्यालय पर्यवेक्षक ज्ञानेश्वर चाकणे, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता रूपाली भालेराव, आरोग्य निरीक्षक सुनील अरण, राजेंद्र पुजारी, किरण जोशी, पायमोडे मॅडम,बाळू दिघे, जावेद शेख, प्रशांत उपाध्ये, रामनाथ जाधव आणि प्रवीण पठाडे, स्वप्नील जाधव आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण शिबिरात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांना आरोग्याविषयी सल्ला, आहार, दिनचर्या व मानसिक आरोग्य यासंबंधी महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही देण्यात आले.संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून विशेष अभिनंदन होत असून, भविष्यातही विविध आरोग्य व सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करून अधिकाधिक लाभदायक कार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.