विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसा निमित्त साई आश्रया अनाथ आश्रमात मिष्टान्न भोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाप्रती अनोखी बांधिलकी जपत अनाथ आश्रमात भोजनाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, देशावर शोककळा पसरलेली असताना विवेकभैय्या कोल्हे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाला आदरपूर्वक प्रतिसाद देत, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांनी शिर्डी येथील साई आश्रया अनाथाश्रमात अनाथ बालकांना व वृद्धांना मिष्टान्न भोजनाचे आयोजन करून मानवतेचे उदाहरण घडविले.
या प्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, युवासेवक सर्व श्री विशाल गोर्डे, सिद्धार्थ साठे, रामदास गायकवाड ,दिनेश आदमाने, रोहित कणगरे, स्वप्निल मंजुळ, सतीश निकम, समाधान कुऱ्हे, प्रशांत संत, अजय शार्दुल, सागर राऊत आणि शुभम गिरे यांनी उपस्थित राहून प्रेमाने सेवा केली.अनाथ बालकांना व वृद्धांना प्रेमाने भोजन वाढले गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य या उपक्रमाच्या यशस्वीतेची साक्ष देत होते.संजीवनी युवा प्रतिष्ठान ही संस्था केवळ सामाजिक कार्याच्या नावाखाली उपक्रम राबवत नाही, तर युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचे कार्य करत आहे.

विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली युवकांना योग्य दिशा मिळते आहे आणि त्यातून समाजहिताची जाणीव असलेली सक्षम पिढी घडते आहे. त्यांच्या कार्यशैलीचा आदर्श घेत युवकांनी हा सामूहिक उपक्रम हाती घेऊन सामाजिक जाणीवेसोबत संवेदनशीलतेचाही आदर्श घालून दिला आहे.आज संजीवनी युवा प्रतिष्ठान ही संस्था केवळ युवकांच्या उभारणीसाठीच नव्हे, तर समाजाच्या सर्व थरातील लोकांसाठी आशेचा किरण बनली आहे. विवेकभैय्या कोल्हे यांचे नेतृत्व आणि त्यांच्या मूल्यांवर आधारित कार्य पद्धतीमुळे आज संस्थेच्या उपक्रमांना व्यापक सामाजिक मान्यता लाभली आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देत, विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसाला खऱ्या अर्थाने अधिक मोल प्राप्त झाले.