आत्मा मालिक

इंडियन टॅलेंट ओलंपियाड मध्ये आत्मा मालिक चा दबदबा

0 5 4 1 8 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

इंडियन टॅलेंट ओलंपियाड तर्फे देशपातळीवर गणित, विज्ञान, इंग्रजी, कला, संगणक इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षा घेण्यात येते. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरूकुल हे पुन्हा अव्वल स्थानी आहे . गुरूकुलाचे ७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले. 13 विद्यार्थ्यांना एक्सलन्स अवॉर्ड, 39 विद्यार्थी गोल्ड मेडल अवॉर्ड, 26 विद्यार्थी सिल्वर मेडल अवॉर्ड, 24 विद्यार्थी ब्राँझ मेडल अवॉर्ड प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.यामध्ये गणित ओलंपियाड मध्ये शिवराज पाटिल राज्यात चौथा, श्रीजीत इंगोले राज्यात पाचवा ,शुभम जाधव राज्यात सहावा, सायन्स ओलंपियाड मध्ये दुर्गेश धनवटे राज्यात पाचवा,कला ओलंपियाड मध्ये सिद्धांत जाजू राज्यात तिसरा, समर्थ खेडकर राज्यात चौथा , हार्दिक बर्वे राज्यात पाचवा, यांनी यश मिळविले.आत्मा मालिक पॅटर्नचे हे यश आहे. याअंतर्गत अभ्यासक्रमाचे सुक्ष्म नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, तयारी शिबीराचे आयोजन, नैदानिक चाचण्या, सराव परीक्षा,

जाहिरात
जाहिरात

तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व शिक्षकांचे परीश्रम यामुळे हे यश साकारले असे मत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. विदयार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे विभाग प्रमुख अनिल सोनवणे, सचिन डांगे, पयवेक्षक नयना शेटे, गणेश रासने, विषय शिक्षक अमोल कर्डिले, गुरुराज सज्जन, मोरेश्वर गायकवाड, प्रसाद करडे, अनिता वाणी, रुपाली होन अथर्व फाऊंडेशनचे शिवम तिवारी, शिक्षक रोहिणी होन, अनुशिखा आस्ताना, प्रियांशू कुमार, हरीश साठे यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंतराव भोगळे, कोषाध्यक्ष विठठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदींनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 8 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे