देवाधिदेवांचा निर्माता म्हणजे आत्मा – संत परमानंद महाराज

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोटी कोटी देवतांचे मूळ एक आहे, त्यांचे उगम स्थान एक आहे. सर्व देवी देवतांचा निर्माता एक आहे तो म्हणजे मूळदेव. तो मूळदेव म्हणजे निर्गुण निराकार अनादी अनंत काळापासून स्थित असलेला आत्मा. आत्म्यापासूनच सर्व देवांची निर्मिती झाली आहे. म्हणूनच आत्म्याची पूजा केली पाहिजे. स्वतः मधील स्वरूपाची म्हणजेच आत्म्याची स्वतः पूजा करण्याचा महोत्सव म्हणजे चैत्र महोत्सव आहे. असा संदेश चैत्र महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित हजारो भाविकांना संत परमानंद महाराज यांनी दिली.यावेळी ते म्हणाले, प्रत्येक जीवाला आत्म्याची ओळख व्हावी यासाठी आत्मज्ञान व आत्मचिंतनाच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला परमात्म्याबरोबरच जोडण्याची अनुभूती देण्याचे कार्य प.पू. आत्मा मालिक माऊली करत आहे. प्रत्येकाच्या हृदयात स्थित असलेल्या आत्म्याची म्हणजेच खऱ्या परमेश्वराची ओळख करून देण्यासाठी सद्गुरूंचा अवतार आहे. सर्व भाविकांनी नियमित ध्यानाच्या माध्यमातून आत्म्याची पूजा करा व आत्मस्वरूपाची ओळख करून घेऊन आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजून घ्या. असे भाविकांना सांगितले.

आत्मा मलिक ध्यानपिठामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी दि. 8 ते 12 एप्रिल दरम्यान चैत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चैत्र महोत्सवामध्ये मौनध्यान, भजन, प्रवचन, हरिपाठ,सत्संग कार्यक्रमाच्या माध्यमातून भाविकांसाठी अध्यात्मिक पर्वणी होती. पवनसुत युवा ग्रुप सुरत गुजरात यांची भजनसेवा या महोत्सवाची विशेष आकर्षण ठरली या महोत्सवास वंदनीय गोविंद देवगिरी महाराज यांचे बंधू वंदनीय हरिप्रसाद व्यास यांनी प.पू. आत्मा मलिक माऊलींची दर्शनभेट घेतली. या पाच दिवसीय चैत्रमहोत्सवा दरम्यान उपस्थित भाविकांची निवास व प्रसाद व्यवस्था ध्यानपीठाच्या वतीने करण्यात आली होती.चैत्रमहोत्सवाच्या निमित्ताने आत्मपूजेचे म्हणजेच शरणाष्टकाचे ऑडिओ फॉर्म मध्ये प.पू. आत्मा मालिक माऊलींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, संत आत्मानंद महाराज, संत गणेश महाराज, संत चंद्रानंद महाराज, संत आशिष महाराज व संत मांदियाळी तसेच ध्यानपिठाचे अध्यक्ष, नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, आदी विश्वस्त उपस्थित होते.