संजीवनी पॉलीटेक्निकने मिळवली राज्यस्तरीय डिपेक्स स्पर्धेत दोन बक्षिसे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
‘सृजन’ या स्वायत्त ट्रस्ट मार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील अभियांत्रिकीच्या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थांमधिल विद्यार्थ्यांसाठी ‘डिपेक्स’ ही टेक्निकल प्रोजेक्ट स्पर्धा घेण्यात येते. पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकने दोन स्वतंत्र वर्गवारीमध्ये बक्षिसे मिळवुन संजीवनी टेक्निकल प्रोजेक्टस् मध्ये आघाडीवर असल्याचे दाखवुन दिले. अशा प्रकारे डिपेेक्स या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत संजीवनीने डबल धमाका उडवुन दिला, अशी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.डिपेक्स ही स्पर्धा एकुण ११ वर्गवरीमध्ये घेतल्या जाते. डिफेन्स अँड सायबर सिक्युरीटी या वर्गवारीत कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या मैत्रेयी अनिल कुलकर्णी, गौरी सुनिल कोटमे, वैष्णवी किशोर जावळे व समृध्दी अनिल लहारे यांनी ‘एआय व्हाईस डिटेक्शन टूल’ हा प्रोजेक्ट प्रात्यक्षिकासह सादर करून सुमारे १५० मुलींच्या गटातुन रू ५००० रोख, विजयचिन्ह (ट्रॉफी) व प्रशस्तीपत्रके असे स्पेशल बक्षिस मिळविले.या प्रोजेक्ट मार्फत मानवी आवाज व हुबेहुब तसाच असणारा कृत्रिम आवाज यातिल यातिल फरक स्पष्ट करून मुळ आवाज ओळखला जातो. ते विद्यार्थ्यांनी दाखवुन दिले. त्यांना प्रा.एम. आर. शेख यांनी मार्गदर्शन केले. तसेच याच स्पर्धेमध्ये मेडीकल अँड हेल्थ केअर वर्गवारीमध्ये मेकॅट्रॉनिक्सच्या अच्युत प्रणिल चौधरी, सुदर्शन अनिल चौधरी, वैष्णवी सुधाकर भोसले व कल्याणी संजय घाडगे यांनी ‘सहयोग-एमपावरींग लाईव्हज वुईथ रोबोटिक प्रिसिझन अँड केअर’

हा प्रोजेक्ट प्रात्यक्षिकासह सादर करून एकुण ५० गटांमधुन दुसरा क्रमांक पटकाविला व रू ५००० रोख रकमेचे बक्षिस, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रके मिळविली. या प्रोजेक्ट मार्फत ज्या लोकांच्या हाताला अपंगत्व आलेले आहे आणि हाताचे कार्य थांबलेले आहे, अशांसाठी रोबोटिकच्या मदतीने कृत्रिम हात तयार करून तो हात कसे कार्य करतो याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी दाखविले. त्यांना प्रा. अभिजीत गवळी यांनी मार्गदर्शन केले.संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, प्राचार्य ए. आर. मिरीकर, विभाग प्रमुख डॉ. जी. एन. जोर्वेकर, प्रा. आय. के. सय्यद, मार्गदर्शक प्रा. षेख व प्रा. गवळी यांचे अभिनंदन केले.