माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे तृतीय पुण्यस्मरण आणि जयंतीच्या निमित्ताने धार्मिक कथा सप्ताहाचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे तृतीय पुण्यस्मरण आणि जयंतीच्या निमित्ताने धार्मिक कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आला आहे. दिनांक १६ मार्च पासून २३ मार्च पर्यंत प्रभू श्रीराम कथा साध्वी ह.भ.प.सोनालीदीदी कर्पे यांच्या अमृतवाणीतून पार पडणार आहे.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट यांच्या वतीने कोपरगाव तहसील मैदान येथे या कथा सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. भाविक मोठ्या संख्येने या कथेमध्ये विविध प्रसंग साकारले जाणार असून माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी कोपरगावसह महाराष्ट्रात केलेल्या कार्याचे स्मरण या निमित्ताने घडणार आहे.गतवर्षी सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.आयोजन नियोजन यात हा सोहळा उल्लेखनीय मानला जातो त्यामुळे यावर्षी होणाऱ्या प्रभू श्री राम कथा श्रवणासाठी सहकुटुंब उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केले गेले आहे.