संजीवनी उद्योग समूह

जीवघेण्या स्पर्धेमुळे ग्रामिण अर्थकारणाची कामधेनु साखर उद्योग अडचणींत शासनांने वेळीच उपाययोजना कराव्यात- बिपीनदादा कोल्हे

0 5 4 0 1 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

साखर उद्योग ही ग्रामिण अर्थकारणाची कामधेनु असुन अलिकडच्या काळात त्यात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे त्यावर शासनांने वेळीच उपाययोजना केली नाही तर साखर उद्योग व त्यावर अवलंबुन असणारे अर्थचक्र आगामी दहा वर्षात पुर्णपणे उध्वस्त होईल अशी भिती संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली. शेतक-यांनी बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एकरी उसाचे उत्पादन वाढवावे असेही ते म्हणाले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाची सांगता संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत तर युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, संचालक रमेश व सौ. छायाताई घोडेराव या उभयतांच्या हस्ते रविवारी झाली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. संचालक रमेश घोडेराव यांचा सपत्नीक बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यांत आला. प्रारंभी मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत करत माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांचे तृतीय पुण्यस्मरणानिमीत्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमीत्त कारखाना कार्यस्थळावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. पुण्यतिथी ते जयंतीनिमीत्त साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या रसाळवाणीतुन तहसिल कार्यालय मैदान कोपरगांव येथे (१६ मार्च पासुन) दररोज सायंकाळी ७ ते १० विविध संत महंतांच्या उपस्थितीत श्रीरामकथेचे आयोजन केले असुन २३ मार्च रोजी काल्याच्या किर्तनांने त्याची सांगता तर कोपरगांव पंचक्रोशी सह परिसरात २४ मार्च हा स्व. शंकरराव कोल्हे यांचा जन्मदिन एक प्रेरणादिन म्हणून विविध उपक्रमांसह सर्वांनी साजरा करावा अशी माहिती कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशव भवर यांनी दिली. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, शेतक-यांच्या एफआरपीत केंद्राने जशी वाढ केली त्याचधर्तीवर साखर विक्री दरात व ज्युस पासुन तयार होणा-या इथेनॉल दरात केंद्र व राज्य शासनाने तात्काळ वाढ करून साखर उद्योगाला दिलासा द्यावा अन्यथा देशातील साखर कारखान्यांचे तोटे वाढुन त्याची झळ सर्वच शेतक-यांना बसेल.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ वर्षाच्या इतिहासात प्रत्येक संघर्षावर मात करत यंदाचा ६२ वा हंगाम सभासद उस उत्पादक शेतकरी, कष्टकरी, आदिंच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला आहे, ए आय तंत्रज्ञान, उपग्रहाच्या सहायांने उस उत्पादन वाढ, तोडणी ते गाळप आदि प्रत्येक टप्प्याची अद्यावत अंमलबजावणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात होत असुन त्याचा उस उत्पादक सभासद शेतक-यासह परिसराला फायदा होतो आहे, पुढील हंगामात साडेआठ लाख टन उसाचे गाळप करण्यासाठी जेथे जेथे आधुनिकीकरण आवश्यक आहे त्याबाबत वेळीच निर्णय घेवुन त्याचे नियोजन पुर्ण करू, त्याचबरोबरच ड्रोनच्या सहाय्याने खतमात्रेसह पीकावरील किडींचे समुळ उच्चाटनासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करू असे सांगुन ते पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा ध्यास, आपले अनुभवी मार्गदर्शनाखाली कारखान्यांचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी वाहनांसाठी इंधन म्हणुन लागणा-या सहकारी तत्वावरील देशातील पहिला बायो-सीएनजी प्रकल्पाचे काम पुर्ण केले असुन पहिल्या टप्प्यात ५ टन उत्पादन घेण्याबाबतच्या सर्व चाचण्या माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या ९६ व्या जयंतीनिमीत्त २४ मार्च रोजी पुर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे कोल्हे कारखान्यात मल्टीफिड डिस्टीलरी उभारणी, शेजारच्या राहाता तालुक्यातील गणेश ही देखील आपलीच कामधुन असुन तेथेही आवश्यक तेथे आधुनिकीकरण केले जाणार आहे.चालु हंगामात पर्जन्यमान चांगले झाले, तुटीच्या गोदावरी खो-यात पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या कामाला माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी चालना दिली, त्याची वळण बंधा-याची कामे सध्या सुरू आहेत. नगर नाशिक विरूध्द मराठवाडा या प्रादेशिक पाणी वादात बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी पुर्णपणे होरपळत आहे, त्याबाबत युवानेते विवेक भैय्या कोल्हे यांनी येथील शेतक-यांच्या हितासाठी गोदावरी अभ्यास गट प्रमोद मांदाडे समितीच्या शिफारशीवर हरकती नोंदवत त्याबाबत कायदेशीर लढाई लढत आहे,

जाहिरात
जाहिरात

जायकवाडी धरण होण्याअगोदर दारणा प्रकल्प ब्रिटिश कालीन आहे तेव्हा त्यावर समन्यायी काय द्यावे कुठल्याही पाण्याचे आरक्षण ठेवू नये, समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे उर्ध्व गोदावरी खो-यातील बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांना पाहिजे त्या प्रमाणांत पाटपाण्यांचे आर्वतन मिळत नाही त्याचा फटका शेती उद्योगाला बसत आहे तेंव्हा आपल्या लोकप्रतिनिधींनी समन्यायी पाणी वाटप कायदा रदद करून गोदावरी कालवे लाभधारकांना पुर्ण क्षमतेने पाणी मिळण्यासाठी विधीमंडळात ठोस भूमिका घेवुन या प्रश्नाची सोडवणूक करावी असेही ते म्हणांले. शेवटी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले.याप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, ज्ञानदेव औताडे, पांडुरंग शास्त्री शिंदे, विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे, रमेश आभाळे, निवृत्ती बनकर, मनेष गाडे, सतिष आव्हाड, प्रदिप नवले, कैलासराव माळी, अशोक भाकरे, अशोक औताडे, भास्करराव तिरसे, शिवाजीराव कदम, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, संभाजीराव गावंड, प्रकाश सांगळे, औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशव भवर, दिलीप बनकर, माजी सभापती सुनिल देवकर, वैभव आढाव, संदिप देवकर, रिपाई नेते दिपक गायकवाड, कामगारनेते मनोहर शिंदे, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे, संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र परजणे, महेश परजणे, सुरेशअंकल कोल्हे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गवळी, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, वर्क्स मॅनेजर विश्वनाथ भिसे, केन मॅनेजर जी.बी. शिंदे, उसविकास अधिकारी शिवाजीराव देवकर, उपशेतकी अधिकारी सी. एन. वल्टे, अॅडमिनीस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, योगेश इंगळे, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, शेतकरी, उसतोडणी कामगार, मुकादम, अमृत व सुवर्णसंजीवनी शुगरकेन संस्थेचे सर्व ट्रकधारक चालक मालक वाहतुकदार, संजीवनी उद्योग समुह सलग्न संस्थांचे सर्व कर्मचारी आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन सेक्रेटरी टी. आर. कानवडे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे