चौथा स्तंभ ज्या दिवशी बाजूला होईल त्या दिवशी या देशांमध्ये अराजकता माजेल -जेष्ठ पत्रकार विलास बडे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोळपेवाडी येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी पत्रकारांचा सन्मान सोहळा आमदार आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून न्यूज १८ लोकमतचे उपसंपादक विलास बडे हे उपस्थित होते याप्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर तसेच कर्मवीर शंकररावजी काळे व सौ सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आमदार आशुतोष दादा काळे पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणाले की खऱ्या अर्थाने सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असतांना या क्षेत्रामध्ये मला काही फार वेळ झालेला नाही पण जे काही माझं कार्य आहे ते आपल्या सर्वांच्या समोर आहे सन २०१४ ला पराभूत झाल्यानंतर जे काही समाजाचे प्रश्न आपल्याकडून जाणून घेतले यात सर्वांचे मार्गदर्शन मिळाले जिथे कुठे समाजातील घटकांवर अन्याय होतोय किंवा काही चुकीचं घडतंय ते आपल्याकडून माहिती झाल्यानंतर त्याच्यावर आंदोलन करण्याची भूमिका किंवा त्याच्यावर काहीतरी करण्याची भूमिका घेऊन तो प्रश्न कसा मार्गी लागेल यासाठी माझे प्रयत्न होते आणि आपण देखील ती भूमिका लोकांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवण्याचं आपण आपल्या माध्यमातून काम केलं म्हणून खऱ्या अर्थाने सन २०१९ ला निवडणुकीला सामोरे जात असतांना जी कामे पाच वर्षांमध्ये केली त्या कामाचा लेखाजोखा आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवला त्यांच्यामुळे थोड्या मताने का होईना मला विजय मिळाला तसेच सुदैवाने सत्ताधारी पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली काही काळ विरोधी पक्षांमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली जे काही काम मी केलं त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या माध्यमातून जेवढे काही काम करता आलं जेवढा निधी आणतां आला तो देखील आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केलं आणि म्हणून २०२४ ची निवडणूक अतिशय मोठ्या मताधिक्याने मला जिंकता आली व या सर्व काळामध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य व प्रेम माझ्यावर तुम्ही केले इथून पुढे देखील ते प्रेम असंच राहावं अशा प्रकारची विनंती त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केली तसेच सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून अभिनंदन करतो व आपल्या सर्वांना आजच्या पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आपले जे काही सहकार्य मागच्या काळात मला लाभले तसेच २०२४ च्या निवडणुकीमध्ये सव्वा लाखाच्या मताधिक्य मिळाले असंच सहकार्य पुढच्या काळामध्ये आपले माझ्यावर राहू द्या एवढीच विनंती या ठिकाणी करतो महायुतीचे सरकार आता भक्कमपणाने आलेले आहे

तेव्हा काही चिंता करायची गरज नाही परत काही विरोधी पक्षात जायचं काही कारण नाही पाच वर्षे आपली सत्ताधारी पक्षामध्ये आपण आहोत जास्तीत जास्त आपल्याला कामे करायचे आहे तसेच तुमच्या माध्यमातून किती का छोटी गोष्ट असेल पण ती आपण माझ्यापर्यंत पोहोचवावी त्यामुळे मला त्या गोष्टी कशा सोडवता येतील हा माझा प्रामाणिक प्रयत्न मागच्या काळामध्ये राहिलेला आहे व पुढे पण तसाच राहिल तसेच मागच्या काळामध्ये कमी मताने जरी निवडून आलो होतो आता जनतेने सव्वा लाखांनी मला निवडून दिले आहे त्यामुळे माझी जबाबदारी निश्चितपणे अधिकच वाढलेली आहे त्यामध्ये आपल्या सर्वांची मदत मला लागणार आहे असे शेवटी आमदार आशुतोष दादा काळे पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणाले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार विलास बडे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की पत्रकारितेला जरी संविधानात चौथा स्तंभ म्हटले नसेल तरीही आजही सगळी व्यवस्था ही लोकशाही पत्रकारितेच्या त्या स्तंभावर आहे कधी फक्त विचार करून बघा हा स्तंभ ज्या दिवशी बाजूला होईल त्या दिवशी या देशांमध्ये अराजकता माजेल ही पत्रकारिता तुम्ही सगळ्यांनी आज पर्यंत जीव धोक्यात घालून पोटाला चिमटा काढून तुम्ही ती जिवंत ठेवलेली आहे जाताना फक्त एकच आवाहन करतो की पत्रकारिता जिवंत ठेवतांना आपण जिवंत राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि हे जिवंत राहण्यासाठी आपण आपल्या चरिर्थासाठी एखादा व्यवसाय एखादा उद्योग किंवा आपलं जे व्यवसायिक अर्थकारण आहे ते सुद्धा सांभाळणं तितकच गरजेचं आहे त्यासाठी पत्रकार उद्योजक बनला पाहिजे पत्रकारांनी आयुष्यामध्ये व्यावसायिक बनले पाहिजे व त्याने स्वतःचे एक साम्राज्य निर्माण केलं पाहिजे त्याच वर्तमानपत्र असले पाहिजे त्यांचे युट्युब चॅनेल असले पाहिजे किमान १० जणांना नोकरी देण्याची क्षमता त्यांनी ठेवली पाहिजे नेत्यांनी पत्रकारांना अडीअडचणीत राजाश्रय व संरक्षण देण्याची खरी गरज आहे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विलास बडे पत्रकारांशी संवाद साधतांना शेवटी म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व पदाधिकारी संचालक व अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी मानले.