आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

अंतिम दराचे १२५ रु.वर्ग करून कर्मचाऱ्यांना देखील २० टक्के बोनस

0 5 3 7 0 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांना अग्रस्थानी ठेवून त्यांना न्याय देण्याच्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या शिकवणीनुसार कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील असा भेदभाव न करता २०२३-२४ ला गळीतास आलेल्या ऊसाला अंतिम पेमेंट रु.१२५/- प्र.मे.टन प्रमाणे देण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून सोमवार (दि.१४) रोजी दिवाळीपूर्वीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पेमेंट जमा करण्यात येणार आहे. जो न्याय ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांना दिला तोच न्याय कर्मचाऱ्यांना देतांना २० टक्के बोनस देण्याचे आ. आशुतोष काळे यांनी जाहीर करून ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांची दिवाळी गोड केली असून साखर कामगारांच्या वेतन वाढीसंदर्भात त्रिपक्षीय समितीचा जो निर्णय येईल त्याची तात्काळ अंमलबजावणी करू अशी ग्वाही दिली आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४/२५ या वर्षाच्या ७० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शंकुतला चव्हाण यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते. पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,महायुती शासनाने ५५ टिएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घेऊन त्याला मंजुरी दिली आहे. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. आपल्यावर सातत्त्याने अन्याय होत असल्यामुळे सुरु असलेल्या गोदावरी अभ्यास गटाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल. चालू वर्षी पाऊस समाधानकारक असला तरी जास्त झालेला नाही.कोपरगाव तालुका पर्जन्यछायेखाली येत असल्यामुळे पावसाच्या सरासरी प्रमाणे पाऊस झालेला आहे. चालूवर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने गोदावरी कालव्यांचे रोटेशन वेळेत होईल. हवामान खात्याने परतीचा पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. कार्यक्षेत्रातील सर्व गावतळी, बंधारे हे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरुन घेतले असून पूर्ण क्षमतेने के.टी.वेअर भरुन घेतले आहे. त्यामुळे शेतक-यांनी चालू लागवड हंगामात जास्तीत जास्त पूर्व हंगामी व सुरु ऊस लागवडी कराव्यात.

ते निवडणुका आल्यावर रोजगार मेळावे घेवून वेळ मारून नेतात

या पाच वर्षात केलेला विकास जनतेसमोर आहे दुर्दैव एवढेच आहे की, मोजक्याच लोकांना तो दिसत नाही ते आपल्या कार्यकर्त्यांना विचारतात तुमच्या गावात निधी आला का? विकास कामे झाली हे कार्यकर्त्यांना पण माहित आहे पण कार्यकर्ते त्यांच्यापुढे संकोच करीत असले तरी विरोधकांचा हा बालिशपणा आहे. जर २३२ कोटी निधी देर्डे फाटा-भरवस फाटा या रस्त्याला आणला. हा निधी धामोरी, चास, वेळापूर, शहाजापूर, देर्डे यापैकी कोणत्या गावाच्या हिशोबात धरायचा. तसेच ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याला १९१ कोटी निधी आणला हा निधी कोकमठाण, जेऊर कुंभारी, कोपरगाव कोणाच्या हिशोबात धरायचा असा प्रति प्रश्न करून आ.आशुतोष काळे यांनी विरोधकांच्या बालिश बुद्धीचे पिसे काढली.सकाळी बारा वाजता उठायचे आणि ऑफिसमध्ये बसून प्रेसनोट काढणाऱ्यांना कसा विकास दिसणार. जे निवडणुका आल्या की मगच घराबाहेर पडतात. रोजगार मेळावे घेवून वेळ मारून नेतात.परंतु जनता आता सुज्ञ झाली असून जनता त्यांच्या गप्पांना आता भुलणार नाही. आपण विकासाबरोबरच शासनाच्या सर्व योजना सर्व समान्य जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत त्यामुळे जनता समाधानी आहे. तुम्ही मात्र बेसावध राहू नका आपण गळीत हंगामही यशस्वी करू आणि येणारी निवडणूकही जिंकू – आ.आशुतोष काळे

चालू हंगामात तुटणा-या ऊसाचे खोडवे ठेवावे. कारखान्याची गाळप क्षमता वाढलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस कार्यक्षेत्रातून उपलब्ध व्हावा यासाठी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ऊस पिकाकरीता ठिबक सिंचनाचा व सेंद्रिय खताचा वापर करून रोग किडीचे नियंत्रण करून खतांचा संतुलित वापर करतांना एकरी उत्पादन कसे वाढेल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी आगवण, पद्माकांत कुदळे, ज्ञानदेव मांजरे, एम.टी. रोहमारे, काकासाहेब जावळे, गौतम बँकेचे मा.चेअरमन बाबासाहेब कोते, बाबुराव कोल्हे, कृष्णराव गाडे, सोमनाथ घुमरे, संभाजीराव काळे, भास्करराव चांदगुडे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, दिलीपराव बोरनारे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सचिन चांदगुडे, राहुल रोहमारे, अनिल कदम, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, दिनार कुदळे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, प्रवीण शिंदे,गंगाधर औताडे, श्रावण आसने, सौ.इंदूबाई शिंदे, सौ.वत्सलाबाई जाधव, मा.उपसभापती अर्जुनराव काळे, गौतम कुक्कुटपालनचे चेअरमन विजयराव कुलकर्णी, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन बापूराव जावळे, गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे,गौतम केनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभाष, गवळी, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, तसेच सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरुण चंद्रे यांनी केले तर संचालक सचिन चांदगुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे