आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

अल्पसंख्यांक आणि दलित समाज विकासाला साथ देण्यासाठी आ.आशुतोष काळेंच्या पाठीशी राहणार

0 5 3 7 6 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव मतदार संघाला विकासाच्या वाटेवर घेवून येणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाचा विकास करतांना सर्वच घटकांना न्याय दिला असून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा त्या त्या समाजाला लाभ मिळवून दिला आहे. यामध्ये दलित आणि अल्पसंख्यांक समाजाचाही मोठा फायदा झाला असून विकासाबरोबरच सर्वच समाज घटकांचे हित साधणाऱ्या आ. आशुतोष काळे यांना साथ देण्यासाठी दलित आणि अल्पसंख्यांक समाज आ. आशुतोष काळेंच्या पाठीशी राहणार असल्याचे नगदवाडी (सोनेवाडी) तसेच वेस सोयगाव येथील दलित आणि अल्पसंख्यांक समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.नगदवाडी (सोनेवाडी) व वेस सोयगाव येथील अल्पसंख्यांक समाज व दलित समाजाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ते पुढे ते म्हणाले की,अल्पसंख्यांक समाजाच्या मस्जिद तसेच दफन भूमीच्या विकासासाठी मतदार संघातील प्रत्येक गावाला भरीव निधी दिला. एवढा निधी आजपर्यंत कुणीच दिला नाही. ज्या ज्या वेळी अल्पसंख्यांक समाजाने आ. आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या त्या अडचणी आ. आशुतोष काळे यांनी तात्काळ सोडविल्या असल्याचे अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच दलित समाज बांधवांनी सांगितले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कोपरगाव शहरातील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणासाठी वेळप्रसंगी स्वत: बाजूला राहून अनावरण करण्यासाठी प्रयत्न करणारे आ.आशुतोष काळे खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचे वारसदार असल्याचे सांगितले. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.यावेळी वेस-सोयगाव येथील शाहरुख सय्यद, इमाम सय्यद, लाला सय्यद, सलमान सय्यद, मुन्ना शेख, अब्दुल शेख, अल्ताफ शेख, अस्लम शेख, मुज्जाहिद सय्यद, अरबाज शेख, अल्ताफ सय्यद, जैनुद्दीन सय्यद, राजेंद्र माळी, सोमनाथ सोनवणे, रामदास गांगुर्डे, संजय माळी, गोरख माळी, पप्पू खंडिझोड, सचिन भालेराव, रामनाथ खंडिझोड, शरद पवार तसेच नगदवाडी (सोनेवाडी) येथील शब्बीर शेख, हकीम शेख, नानासाहेब बत्तासे, नामदेव साळवे, मंगेश साळवे, संदीप साळवे, महेश साळवे, बबन साळवे, ज्ञानेश्वर साळवे, भाऊराव साळवे, किसन साळवे, छबुराव साळवे, गणेश साळवे, देविदास साळवे, रोहिदास साळवे, मारुतीराव साळवे, किरण साळवे, नारायण साळवे, विठ्ठल साळवे, सूर्यभान साळवे, जगन साळवे, नरेश साळवे, प्रशांत साळवे, शरद त्रिभुवन, समीर साळवे, राजु शेख आदींनी प्रवेश केला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे