कोपरगाव मतदार संघाची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार पोहेगावला ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयास मान्यता-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदार संघातील पोहेगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यासाठी पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होवून ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने पोहेगावला ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघाची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव मतदार संघाची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून घेत उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळविली असून २८.८४ कोटी निधी देखील आणला आहे. सद्य स्थितीत या उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याप्रमाणेच मतदार संघात ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आवश्यक आहे व ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना पूर्ण क्षमतेने आरोग्य सेवा पुरविल्या जात नाही त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी आरोग्य विभागाकडे त्यांचा पाठपुरावा सुरु होता.यामध्ये पोहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा देखील समावेश होता.या पाठपुराव्यातून आरोग्य मंत्रालयाने पोहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी देवून ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोहेगावसह पंचक्रोशी तसेच मतदार संघातील नैऋत्य भागातील अनेक गावातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचे नागरिकांनी आभार मानले आहे. पोहेगावला ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार,आरोग्यमंत्री ना.तान्हाजी सावंत यांचे पोहेगावसह पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहे.