कापूस, सोयाबीन अनुदानापोटी १५.६२ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात -आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महायुती शासनाने २०२३ च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेतलं होत त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १५.६२ कोटीच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.२०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापसाला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी महायुती शासनाने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. कोपरगाव मतदार संघातील खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिक घेतले होते.यामध्ये ३५९४२ वैयक्तिक व ५५९३ सामाईक शेतकऱ्यांचा समावेश असून ३८२०५ सोयाबीन उत्पादक शेतकरी व ३३३० कापूस उतप्द्क शेतकऱ्यांचा समावेश आहे. सोयाबीन व कपाशी पिकासाठी हेक्टरी ५००० व जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.शासनाच्या या निर्णयानुसार कोपरगाव तालुक्यातील एकूण ४१,५३५ शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. सध्या खरीप पिकांच्या काढणीचा तर काही ठिकाणी रब्बीची तयारी करण्यात शेतकरी गुंतला आहे. यावर्षी पाऊस देखील प्रमाणापेक्षा जास्त नसला तरी समाधानकारक आहे. त्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या काढणी खर्चाला व रब्बी पिकांच्या पूर्व तयारीला या अनुदानाच्या रक्कमेतून शेतकऱ्यांना काही अंशी हातभार लागणार आहे. त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, कृषी मंत्री ना.धनंजयजी मुंडे यांचे आभार मानले आहे. सोयाबीन व कापूस अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक आहे. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यांनी तातडीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.