समता परिवाराने गेल्या ८ वर्षापासून अंध,अपंग, निराधारांची केली अन्नसेवा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
समता परिवाराच्या मातृतुल्य सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या ६८ व्या वाढदिवसा निमित्त समता परिवाराच्यावतीने कोपरगाव शहरातील अंध, अपंग, गरजू, निराधार अशा ६८ महिला व पुरुषांना मिष्टान्न अन्नदान सेवा देऊन समता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते सोलापुरी चादर भेट देण्यात आली.याप्रसंगी सौ.सुहासिनी कोयटे म्हणाल्या की, समता परिवाराच्या वतीने अनाथ,अंध,अपंग,निराधारांना दररोज घरपोहच मोफत डबे गेल्या ८ वर्षापासून सुरू आहे.
माझे सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळचे भागते.डबे व्यवस्थित असून वेळेवर येतात. त्यांचा जोडा राम सीता सारखा असून देव तुमचे कल्याण करो – विमलबाई शिवाजी पवार (वय १०५), लाभार्थी
सणासुदीला देखील उच्च प्रतिचा,पौष्टिक मिष्टान्न स्वरूपाचा आहार दिला जातो.या सामाजिक कार्यातून सामाजिक दायित्वाची परंपरा सुरू असून गरजवंताला अन्न देऊन मदत करणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे.या सामाजिक कार्यात समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता नागरी सहकारी पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल यांचे नेहमीच सहकार्य मिळते.
काका आणि काकी तसेच त्यांचा समता परिवार आम्हा विधवा अनाथांची सेवा करीत आलेला आहेत. गाय गरिबाला दान धर्म करीत आलेले आहे. ते आमच्यासाठी देवच आहे. परमेश्वराने त्यांना सुखी ठेवावे आणि त्यांच्याकडून अधिक समाजाची सेवा घडावी – हिराबाई बाबुराव लोखंडे (संजय नगर) लाभार्थी
या सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यामध्ये देखील महत्त्वाचा वाटा असतो.सौ.सुहासिनी कोयटे यांनी निवारा परिसरातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालय शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा,
समता महिला बचत गट अध्यक्षा, निवारा महिला भजनी मंडळ अध्यक्षा, समता इंटरनॅशनल स्कूल आस्वाद मेस विभागाच्या अध्यक्षा अशा प्रकारच्या विविध पदांवर काम करत असून कामाचा ठसा उमटविला आहे.
कोपरगाव नगरपालिका माजी नगराध्यक्षा म्हणून काम करत असताना देखील शहराच्या विकासाची कामे करून राजकीय क्षेत्रात एक नवीन ओळख निर्माण केली आहे.काका आणि काकी आम्हाला दररोज मोफत जेवण देतात.