पूर्व भागातील साठवण बंधाऱ्यांत आले पाणी,विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
पालखेड डाव्या कालव्यातून कोपरगावच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाण्यासाठी पाझर तलाव व साठवण बंधारे कोरडेठाक झाले होते.जोराचा पाऊस झाला त्या काळात ओव्हर फ्लोचे पाणी मिळावे यासाठी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी पाठपुरावा केला होता.त्यानंतर विरोधकांना जाग येऊन त्यांनी घाई घाईत एका ठिकाणी जलपूजन करून जणू सर्वच गावांना पाणी मिळाले असे भासवण्याचा प्रयत्न केला होता. यावर आक्रमक पवित्रा घेत कोल्हे यांनी येवला येथे जावून अधिकाऱ्यांना अनेक गावांना पाणी मिळत नाही हे लक्षात आणून देत येवला येथे पालखेड डावा कालवा कार्यालय येथे जाऊन कोळगंगा गेट खुले करत पाणी उपलब्ध करून घेतले. या पाण्याचे आगमन झाल्यानंतर शिरसगाव -सावळगाव येथील कोळ नदीवरील साठवण बंधाऱ्याचे जलपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. आ.आशुतोष काळे यांना पाणी नियोजन पाच वर्षात जमले नाही यावर शेतकऱ्यांचा रोष सर्वत्र या निमित्ताने दिसला.श्री व सौ प्रभाकर कोंडीराम उकिर्डे तसेच श्री व सौ रविकांत रावसाहेब भवर यांनी सपत्नीक पूजा केली.या प्रसंगी संचालक त्र्यंबक सरोदे, केशवराव भवर,साहेबराव रोहम साहेब,बबनराव निकम,माधवराव रांधवणे,अंबादास पाटोळे,रावसाहेब लासुरे आदींसह शिरसगाव, सावळगाव, तिळवणी,आपेगाव, गोधेगाव, दहेगाव बोलका, पढेगाव, कासली, उक्कडगाव या गावातून बहुसंख्य लाभार्थी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.विवेकभैय्या कोल्हे यांनी बोलताना तालुक्यात पाण्याचा प्रश्न भिषन बनला आहे.पर्जन्य झाले त्यातून इतर ठिकाणी पाणी डोळ्यासमोर वाहून जात असताना आपल्याकडे मात्र बंधारे भरून घेण्यासाठी संघर्ष करावा लागणे हे दुर्दैवी आहे.
स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी ठिकठिकाणी दोनशे साठवण बंधारे तालुक्यात बांधून ठेवले म्हणून आज आपल्याला पाणी मिळत आहे याची आठवण साहेबराव रोहम यांनी बोलताना व्यक्त दिली.
आमदारांना आपल्या तालुक्यात चाऱ्या किती व पाणी किती मिळते हा प्रश्न विचारला पाहिजे.ते प्रसिद्धीसाठी खोट्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करीत असून त्यावर विश्वास ठेवू नये.पाणी प्रत्यक्षात किती गावांना मिळाले कुठे मिळाले याचा अभ्यास त्यांनी करावा मगच प्रसिध्दी लाटावी. आमदारांचे चुकीचे निर्णय आणि धोरणामुळे चांगले प्रकल्प झाले नाही त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी वाढली म्हणून गुन्हेगारी वाढत चालली आहे त्यावर ते काहीच का बोलत नाहीत अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.आपण संघर्ष करणारे माणसे आहोत.स्व.कोल्हे साहेब यांनी साठवण बंधारे आणि पाणी प्रश्न यावर काम केले त्यामुळे जनतेने भरभरून साथ दिली.आज त्याच बंधाऱ्यांचे प्रसिध्दीसाठी जलपूजन करण्याची वेळ आमदारांवर आली आहे.एकीकडे हजारो कोटींच्या वल्गना दुसरीकडे आपला शेतकरी मात्र पाण्यावाचून वंचित राहतो आहे याची जाणीव त्यांना नाही.ठराविक एखादे पावसाच्या ओव्हर फ्लो पाण्याने भरलेले पाणी पूजन करून नौटंकी करण्यापेक्षा त्यांनी बहुतांशी भागात तलाव आणि बंधारे रिकामे होते हे बघण्याचे कष्ट घेऊन काम करने अपेक्षित होते असे देखील कोल्हे म्हणाले.पूर्व भागातील बंधारे हे विवेकभैय्या कोल्हे यांच्या धडक प्रयत्नातूनच भरले गेले.त्यामुळे आमचे भागातील जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला व अशा दुष्काळी परिस्थितीत आम्हाला आधार दिला अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.