विजेचा लपंडाव शेतकऱ्यांचा विजेसाठी अधिकाऱ्यांना घेराव

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदारसंघात विजेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शेती सह घरगुती विजेचे देखील अवेळी होणारे भारनियमन त्रासदायक ठरते आहे.शेतीला पाणी,विद्यार्थ्यांना अभ्यास,जंगली हिंस्र प्राण्यांचा ग्रामीण भागात सुरू असलेला वावर हा जीवघेणा ठरत असून सातत्याने वीज घालवून आमच्या जिविताशी खेळू नका म्हणून शेतकऱ्यांनी कोपरगाव एम एस ई बी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर बसून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.एकीकडे सरकार म्हणते चोवीस तास वीज देऊ तर दुसरीकडे कोपरगाव मतदारसंघ मात्र यासाठी अपवाद आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.सातत्याने डी पी खराब झाले की ते मिळण्यासाठी काय सोपस्कार पार पाडावे लागतात हे अनेकांनी कटू अनुभव घेतले आहे.वारंवार असा वीजप्रवाह खंडित झाल्याने शेती करने कठीण झाले आहे.रात्री अपरात्री लपंडाव खेळणारी वीज जीवावर उदार होऊन शेतीचे सिंचन करण्यासाठी अडचण ठरते आहे.तालुक्यात हजारो कोटींचे फ्लेक्स लावले जात आहे पण शेतकऱ्याला हक्काची आणि शेतीला दिवसाची वीज आपण देण्यास कमी पडला आहे याचा विचार विद्यमान लोकप्रतीनिधी यांनी करावा असे मत सर्वांनी व्यक्त केले.पाण्याचे ढिसाळ नियोजन झाल्याने आधीच आमची शेती संकटात होती.अतिशय ढिसाळ नियोजन सुरू असून जर येत्या काळात हे सुधारले नाही तर लाक्षणिक संख्येने शेतकरी तीव्र आंदोलन करतील अशा इशारा देण्यात आला.यावेळी अधिकारी श्री.राठोड यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी साहेबराव रोहोम,प्रदीप नवले,दीपक चौधरी,विक्रम पाचोरे,यादवराव संवत्सरकर, डी.पी औताडे,डॉ.विजय काळे,भीमा संवत्सरकर,संदीप देवकर,निलेश देवकर,संजय देवकर, ज्ञानदेव जगधने,तुकाराम आसणे, अर्जुन नरोडे,नानासाहेब जाधव, पांडुरंग डफाळ,अतुल सुराळकर,कपिल सुराळकर,किरण गायकवाड,छगन गोसावी,पुंडलिक गांगुर्डे,गणेश थोरात,संदीप थोरात,बद्रीनाथ सांगळे,विनोद सोनवणे,अनिल सांगळे,गणेश आव्हाड,माधव कुटे,मुकेश चंद्रे,अमोल दवंगे,बापू खोंड,किसन गव्हाळे,अंबादास पाटोळे,दत्तू पाटोळे,पुंज शिंदे,रमेश चांगदेव बोळीज,वेनुनाथ बोळीज,निरंजन गुडघ,सतीश केकाण, प्रकाश दवंगे,सतिश बोरावके,सतिश भोसले,रावसाहेब मोकळ,ऋषिकेश कदम,विकास निकम,गणेश मोरे,जयवंत मोरे, नारायन मोरे,राजेंद्र मोरे,विकास मोरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.