आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

कोपरगाव शहराच्या विविध विकासकामांसाठी २५ कोटी निधी मंजूर -आ.आशुतोष काळे

0 5 4 0 0 4

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटी निधी आणणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासाला देखील आजवर शेकडो कोटी निधी आणला आहे. हा निधीचा ओघ अद्यापही सुरूच असून पुन्हा एकदा कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांसाठी महायुती शासनाने २५ कोटी मंजूर केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.मागील साडे चार वर्षात विकासाची गंगा कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक गावात पोहोचविण्यात आ. आशुतोष काळे यशस्वी झाले असून यामध्ये कोपरगाव शहर देखील अपवाद नाही. कोपरगावचा मागील अनेक दशकापासूनचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच कोपरगाव शहरातील सर्व मुख्य रस्ते, आरोग्य, शासकीय इमारती, शहर सुशोभीकरण, विविध समाजाची समाज मंदिरे, हद्दवाढ झालेल्या भागाचा विकास करून नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे कोपरगावकर समाधानी आहेत मात्र निधी आणण्यासाठी अग्रेसर असलेल्या आ.आशुतोष काळे यांची आजतागायत निधी मिळविण्याची भूख न भागल्यामुळे त्यांचा निधी आणण्याचा सपाटा सुरूच आहे. त्याबाबत आ. आशुतोष काळे यानी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराला पुन्हा २५ कोटी निधी महायुती शासनाने मंजूर केला आहे.या २५ कोटी निधीतून कोपरगाव शहरातील विविध विकास कामांचा समावेश असून यामध्ये कोपरगांव नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. २ मधील साईसिटी ते काका कोयटे घर रस्ता करणे (५० लक्ष), नगरपालिका हद्दीतील सर्व्हे नं. २१५ मध्ये वालकंपाऊड व सुशोभिकरण करणे (२० लक्ष), प्रभाग क्र.१ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक व पूल करणे (०१ कोटी), प्रभाग क्र.२ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे करणे (०१ कोटी), प्रभाग क्र.३ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे (०१ कोटी), प्रभाग क्र. ४ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे(०१.१० कोटी), प्रभाग क्र.५ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे (५० लक्ष), प्रभाग क्र.६ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे(०१ कोटी), प्रभाग क्र. ७ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे(०१ कोटी), प्रभाग क्र.८ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे (०१ कोटी), प्रभाग क्र. ९ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे (०१ कोटी), प्रभाग क्र. १० मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे (०१ कोटी), प्रभाग क्र. ११ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे (०१ कोटी), प्रभाग क्र.१२ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे (०१ कोटी), प्रभाग क्र. १३ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे (०१ कोटी), प्रभाग क्र. १४ मध्ये अंतर्गत रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे (०१ कोटी), प्रभाग क्र.१२ मध्ये इदगाह मैदान संरक्षक भिंत व कॉंक्रीटीकरण करणे (५० लक्ष), शुक्लेश्वर मंदिर सुशोभिकरण करणे (८० लक्ष), कोपरगांव नगरपालिका हद्दीतील दत्तपार विकसित करणे (५० लक्ष), कोपरगांव नगरपालिका हद्दीतील मेन रोड सुशोभिकरण करणे (०२ कोटी), धारणगांव रोड सुशोभिकरण करणे (०२ कोटी), कोपरगांव नगरपालिका हद्दीतील व्यापारी संकुल विकसित करणे (०२.५० कोटी), प्रभाग क्र.१० मध्ये माऊली सांस्कृतिक भवन बांधणे (०१ कोटी), प्रभाग क्र.६ मध्ये सभामंडप बांधणे (२० लक्ष), प्रभाग क्र. १० मध्ये वालकंपाऊड बांधणे व सुशोभिकरण करणे (३० लक्ष), प्रभाग क्र.१ मध्ये सभामंडप बांधणे (२० लक्ष), प्रभाग क्र.७ मध्ये सभामंडप बांधणे (१० लक्ष), सर्व्हे नं.१०५ गांधीनगर येथील सभागृह बांधणे (१० लक्ष), खडकी रोड ते साळवे घर मंडप जुना टाकळी रस्ता करणे (५० लक्ष) या विकासकामांचा समावेश आहे. शहरातील प्रत्येक प्रभागाला व प्रभागातील प्रत्येक घटकांचा विकास करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी निधी देवून कोपरगाव शहराला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणले आहे. त्यामुळे कोपरगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलला जावून कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलण्यास मदत होणार असून कोपरगावचे नागरिक व व्यापारी बांधवांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे