कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन

पढेगाव माऊली मंदिराजवळ दुचाकीचा अपघात एक जण ठार तालुका पोलिसात गुन्हा दाखल

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर बहिरू चौधरी वय- 63 वर्ष यांचे पढेगाव शिवारात दुचाकी अपघातात जखमी झाल्याने त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना नुकतेच त्यांची निधन झाले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर चौधरी हे आपल्या दुचाकीवरून (एम एस 17 ए यु 732) वरून कोपरगाव वरून शिरसगाव कडे जात असतांना पढेगाव हद्दीत असलेल्या माऊली मंदिराजवळ रस्त्यावरील खड्डा चुकवतांना तोल जाऊन ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्यात व खांद्यास गंभीर इजा झाली होती त्यांच्या वर रुग्णालयात उपचार सुरू असतांना दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी त्यांचे 11.06 मिनिटांनी रुग्णालयात निधन झाले त्यांच्यावर शिरसगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रकरणी साईनाथ ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिनांक 07 सप्टेबंर 2024 रोजी दुपारी 13.01 मिनिटांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला येऊन सदर घटनेची माहिती देऊन याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 308/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 106 (1) 281,125 (ब) 324 (4) (5) मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व पोलीस हेडकॉन्स्टेबल निजाम शेख यांनी भेट दिली असून सदर घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल निजाम शेख हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे