उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे हात बळकट करण्यासाठी आ.आशुतोष काळेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या-ओबीसी प्रदेशाध्यक्ष आखाडे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन विकास कामांच्या बाबतीत सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना समसमान न्याय दिला आहे.उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सरकारच्या माध्यमातून अठरा पगड जातीतील नागरिकांचे हित साधतांना सर्व घटकांना सामावून घेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या मदतीने कोपरगाव मतदार संघाचा न भूतो न भविष्यती असा सर्वांगीण विकास करणाऱ्या आ. आशुतोष काळेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले आहे.राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क अभियान सुरु असून कोपरगाव शहरात आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या ओबीसी समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी ओबीसी समाज बांधवांशी संवाद साधतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, महायुती शासनाने सर्व समाजाला प्रवाहात आणण्यासाठी अनेक महामंडळ स्थापन केले असून नुकतेच तिळवण तेली समाजासाठी देखील संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे.आज पर्यंत सरकारने आपल्या सर्वांसाठी भरपुर केले आहे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याची भरपाई करून द्यायची असून कोपरगाव मतदार संघाच्या विकासाची गंगा प्रवाहित ठेवण्यासाठी आ.आशुतोष काळे यांना पुन्हा संधी द्या असे आवाहन केले.
संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी तिळवण तेली समाजाची मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांची शिर्डी विमानतळावर आ.आशुतोष काळे यांनी तिळवण तेली समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घडवून देत आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची मागणी केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याची प्रचीती काही दिवसापूर्वीच येवून संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना देखील करण्यात आली आहे. त्याबद्दल तिळवण तेली समाजाच्या वतीने आ. आशुतोष काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, महायुती शासनाने अनेक कल्याणकारी योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे यामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांची भूमिका देखील अत्यंत महत्वाची असून त्यांच्या सहकार्यामुळेच कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला मी साडे तीन हजार कोटी निधी पर्यंत पोहोचू शकलो.महायुती शासनाने कल्याणकारी योजना आणल्या आणि या यशस्वीपणे सुरु देखील ठेवल्या आहे त्यामुळे आपल्या समस्या जाणणारे सरकार अशी भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे. पाच वर्षांत सातत्याने विकासाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले व जनतेच्या आशीर्वादाने यश देखील मिळाले. झालेला विकास मतदार संघातील जनता जाणून आहे. त्यामुळे यापुढील काळात सर्व कार्यकर्त्यांनी सातत्याने मतदारांच्या संपर्कात राहून येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावे यापुढील काळात मतदार संघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडून यापेक्षा जास्त निधी आणू अशी ग्वाही दिली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष रमेश गवळी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष कारभारी जावळे, युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास धनगर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राहुल देवळालीकर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, मा.नगरसेवक विरेन बोरावके, डॉ.चंद्रशेखर आव्हाड आदी मान्यवरांसह ओबीसी समाज बांधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालनगोरख वैद्य यांनी केले तर आभार ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष कारभारी जावळे यांनी मानले.