त्याचवेळी मंजूर बंधारा काळे कारखान्याकडे हस्तांतरित केला असता तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते -आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण होत आहे याचे मोठे समाधान आहे. मात्र ज्यावेळी हा बंधारा वाहून गेला त्यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये व बंधाऱ्याची लवकरात दुरुस्ती व्हावी यासाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या संजीवनी कारखान्याला मंजूर बंधारा कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याकडे हस्तांतरित करण्यासाठी विनंती केली. ग्रामपंचायतीचे ठराव पण दिले. मात्र त्यांना या भागातील शेतकऱ्यांशी काही देण घेण नसल्यामुळे त्यांनी हा मंजूर बंधारा हस्तांतरित केला नाही. त्यावेळी बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मनात खूप इच्छा होती पण त्यावेळी मी आमदारही नव्हतो. त्यामुळे त्यांच्या कमीपणा पायी जे व्हायचे तेच झाले आणि २०१९ ला पुन्हा बंधारा वाहून जावून त्यासोबत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकासह शेत जमिनी देखील वाहून गेल्या याचे दु:ख आहे. जर त्यावेळी मंजूर बंधारा हस्तांतरित केला असता तर फक्त पन्नास लाखात काम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान देखील टाळता आले असते मात्र त्यांच्यामुळेच मंजूर बंधाऱ्याच्या कामाला विलंब होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची टीका आ.आशुतोष काळे यांनी कोल्हेंवर केली आहे.दोन दशकापासून प्रलंबित असलेल्या व तब्बल तीन वेळा वाहून गेलेल्या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून व आ.आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून मिळालेल्या ४१.५१ कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर महापीठाधीश्वर दत्तरत्न स्वामी शिवानंदगीरीजी महाराज व आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच आ.आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नातून आशीयाई विकास बँकेकडून देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचे २३२ कोटी निधीतून होणाऱ्या कामाचे ऑनलाईन उद्घाटन पार पडले यावेळी शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा मंजूर बंधाऱ्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल व देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्यासाठी २३२ कोटी निधी दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचा मंजूर, कारवाडी, हंडेवाडी, चासनळी, वडगाव, बक्तरपूर, मोर्विस, धामोरी, मायगाव देवी, मढी बु, मढी खुर्द, देर्डे कोऱ्हाळे, देर्डे चांदवड, शहाजापुर, सुरेगाव, वेळापूर आदी गावांतील शेतकरी व नागरिकांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदा दुध संघाचे माजी संचालक राजेंद्र जाधव होते.ते म्हणाले की, मंजूर बंधाऱ्याच्या कामाला प्रशासकीय मान्यते बरोबरच निधीची तरतूद होणे गरजेचे होते.एवढा मोठा निधी मिळवितांना अडचणी देखील आल्या मात्र उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे आपल्याला दिलेला शब्द पूर्ण केला. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात ते विरोधी पक्षाचे आमदार असतांना त्यांनी चास नळीच्या पुलाचे सात मोऱ्यांच्या पुलांची कामे पूर्ण करून राज्य मार्ग ०७ रस्ता व्यवस्थित ठेवला मात्र स्वातंत्र्यानंतर ज्यांच्याकडे ४० वर्ष सत्ताधारी पक्षाची सत्ता होती त्यांच्याकडून मागील पाच वर्षांमध्ये या रस्त्यावर एक खडा सुद्धा पडला नाही त्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. राज्य मार्ग ०७ देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याला यापूर्वी १० कोटी निधी देवून रस्त्याचे काम पूर्ण केले परंतु या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर व्हावे यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून आशीयाई विकास बँकेकडून तब्बल २३२ कोटी निधी मिळविला असून या रस्त्यामुळे मतदार संघाच्या वैभवात भर पडणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजूर बंधारा दुरुस्तीचा तसेच राज्य मार्ग ०७ देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याला देखील भरघोस निधी देण्याचा शब्द दिला होता. त्यावर विश्वास ठेवून मला निवडून देवून काम करण्याची संधी दिली. मी शब्द दिल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केला आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव म्हणाले की, पाच वर्षात कोपरगाव तालुक्यात आ.आशुतोष काळे यांनी कामाचा झपाटा लावल्यामुळे अल्पावधीतच तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला असून त्यांनी आधी कामे केली मग जनतेला सांगितली.मंजूर बंधारा, आरोग्य, सर्व सामान्य नागरिक,महिला, समाजातील प्रत्येक घटकाचे हित त्यांनी जोपासले आहे. आज जी काही विकासकामे मतदारसंघात होत आहेत ही कामे त्यांच्याच माध्यमातून झाली असून कोपरगाव शहरातील ग्रामीण भागातील रस्त्यासाठी भरघोस निधी दिल्यामुळे रस्त्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.मंत्रालयातून आपल्या तालुक्यासाठी निधीची तरतूद करून तो निधी आणणे सोपी गोष्ट नाही मात्र आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाचे भविष्य उज्वल करून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. विकास कामे म्हणजे काय असतो हे त्यांनी दाखवले असून पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणावे हा ऐतिहासिक विषय असून हे काम आ. आशुतोष काळे यांच्या हातून घडले जावे अशी अपेक्षा व्यक्त करून तुमच्या कामाची पाच वर्षातील कार्यपद्धती पाहता हे काम तुम्हीच करू शकता याचा माझ्यासह मतदार संघातील जनतेला विश्वास असून आ.आशुतोष काळे पुन्हा शंभर टक्के आमदार होणार असा विश्वास आपल्या अध्यक्षीय भाषनात राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केला.यावेळी ज्ञानदेव मांजरे, सोमनाथ चांदगुडे, पंडितराव चांदगुडे, चंद्रशेखर कुलकर्णी, नारायण मांजरे, योगेंद्र राजेभोसले, प्रमोद आभाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, सर्व संचालक मंडळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच मंजूर, कारवाडी, हंडेवाडी, चासनळी, वडगाव, बक्तरपूर, मोर्विस, धामोरी, मायगाव देवी, मढी बु, मढी खुर्द, देर्डे कोऱ्हाळे, देर्डे चांदवड, शहाजापुर, सुरेगाव, वेळापूर आदी गावांतील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.