करंजीत कोल्हे गटाला पुन्हा धक्का, अमृत संजीवनीचे माजी संचालक विकास शिंदे राष्ट्रवादीत दाखल

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोल्हे गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसून त्यांचे जवळचे विश्वासू सहकारी त्यांना कंटाळून निघून जात असून संवत्सर येथील कार्यकर्त्यांपाठोपाठ करंजी येथील अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे माजी संचालक विकास शिंदे यांनी आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत आपले सहकारी संदिप शिंदे, केशव शिंदे, विकास शिंदे आदी कार्यकर्त्यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. दोनच दिवसात कोल्हे गटाला बसलेला हा दुसरा धक्का आहे.आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी ऐतिहासिक कामगिरी करतांना ३००० हजार कोटीपेक्षा जास्त निधी आणला आहे. त्यामुळे मतदार संघातील प्रत्येक गावाला विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला असून अनेक वर्षापासून तर काही दशकापासून प्रलंबित असलेली कामे आ. आशुतोष काळे यांनी या पंचवार्षिक मध्ये पूर्ण करून दाखविली आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने एक कर्तबगार लोकप्रतिनिधी मतदार संघाला लाभला असून आपापल्या गावातील विकासाच्या जास्तीत जास्त समस्या आ.आशुतोष काळेच सोडवू शकतात याची प्रत्येक नागरिकांना खात्री पटली असून यामध्ये कोल्हे गटाचे कार्यकर्ते देखील मागे नाहीत. ज्या करंजी गावाला कोल्हेंची चाळीस वर्ष सत्ता असतांना जेवढा निधी आला नाही तेवढा निधी आ. आशुतोष काळेंनी या पाच वर्षात एकूण ४२ कोटीचा निधी दिला आहे. त्यामुळे यापुढील काळात करंजी गावाबरोबरच मतदार संघाचा देखील जास्तीत जास्त विकास व्हावा या उद्देशातून कामाच्या आमदाराच्या मागे ताकद उभी करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे यावेळी संचालक विकास शिंदे यांनी सांगितले.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन कारभारी आगवण, सांडू पठाण, गौतम बँकेचे संचालक संजय आगवण, भास्करराव शहाणे, नारायण भारती, चांगदेव कापसे, विजय गायकवाड, गोपाल कुलकर्णी, एकनाथ लांडबिले, उत्तम गायकवाड आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.