कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

शासन हमीभाव दराने सोयाबीन खरेदीचे पेमेंट शेतक-यांच्या खात्यात जमा-साहेबराव रोहोम

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

महाराष्ट्र शासनाने सन 2024-25 करिता सोयाबीन शेतीमालाचा आधारभुत दर रूपये 4,892/- जाहिर केला असुन कोपरगांव तालुक्यातील शेतक-यांसाठी कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांवच्या मुख्य़ मार्केट यार्ड या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावर शासनाच्या सन 2024-25 या वर्षाकरिता आधारभुत दर रूपये 4,892/- या प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी केली आहे. सध्या सोयाबीनचे भाव पडलेले असल्याने यामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.कोपरगाव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील 556 शेतकरी वर्गाने 8590 क्विंटल (17180 गोणी) सोयाबीन शेतमाल विक्री केलेला असुन

जाहिरात
जाहिरात

त्यापैकी 305 शेतकरी वर्गाने विक्री केलेल्या 4,797 क्विंटलचे पेमेंट 4892/- ने रक्क़म रुपये 2,34,66,924/- शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव किसनराव रोहोम व उपसभापती गोवर्धन बाबासाहेब परजणे यांनी दिली आहे. कोपरगाव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीच्या मुख्य़ मार्केट यार्ड या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या उर्वरित शेतकरी वर्गाची 3,793 क्विंटल सोयाबीन खरेदीची रक्क़म रूपये 1,85,55,356/- पुढिल 7 दिवसात शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर वर्ग होईल अशी माहिती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी दिली आहे.

3/5 - (2 votes)

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे