ऑपरेशन सिंदुरचे यश हे भारतवासियांच्या शौर्याचे प्रतिक – विंग कमांडर देवेंद्र औताडे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
ऑपरेशन सिंदुरचे यश हे तमाम भारतवासियांच्या ध्यासाचं शौर्याचे प्रतिक आहे, भारत ही आमची पहिली मातृभुमी त्यानंतर आई वडील असे प्रतिपादन भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर देवेंद्र बाबासाहेब औताडे यांनी केले. भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर देवेंद्र औताडे यांना ऑपरेशन सिंदुर कामगिरीबददल शौर्य पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्थ सुमितदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी प्रास्तविक केले.अध्यक्षपदावरून बोलतांना बिपीनदादा कोल्हे म्हणाले की, भारतीय वायुसेनेचे भूषण आणि आमच्या कुटूंबातील घटक देवेंद्र औताडे यांनी देशवासियांना अभिमान वाटेल अशी कामगिरी बजावून आई वडीलांनी दिलेल्या संस्काराची परतफेड केली आहे.

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी येथील युवकांना सैन्यातील भरतीपुर्व प्रशिक्षण देण्यांचे केंद्र सुरू करून त्यातुन शेकडो युवकांमध्ये देशसेवेची भावना जागृत करण्याचे काम केले त्यांच्याच पावलांवर पाउल ठेवुन हे काम आम्ही सुरू ठेवले आहे. राज्याचे पहिले सहकारमंत्री आणि मराठवाडयाचे भूषण स्व. विनायकराव पाटील यांचे नातु म्हणून देवेंद्र औताडे यांनी भारतीय वायुसेनेत जी अनमोल कामगिरी केली त्याचा आमच्यासह माळेवाडी श्रीरामपुर वासियांसह भारत देशाला गर्व आहे.देवेंद्र औताडे सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की, कष्टकरी शेतक-याचा मुलगा म्हणून मला भारतीय वायुसेनेत देशाची सेवा करण्याचे काम मिळाले हेच माझे आयूष्याचे सार आहे. संजीवनीच्या परिसरात माझे बालपण गेले येथुन मला भारतीय वायुसेना देशसेवेचे बाळकडू मिळाले, आई वडीलांच्या ध्यासातुन अहोरात्र कष्ट घेत मनांत ठरविलेली जिदद पुर्ण केली.

हा परिसर आणि माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा संघर्ष मला प्रेरणा देत राहिल. देशासाठी लढणे ही आमची ऊर्जा असते. जेव्हाही आपल्या देशावर संकट येते तेव्हा भारतीय म्हणून आपण एक होऊन तुटून पडतो.यावेळी औताडे यांचे अभिनंदन करत तहसिलदार महेश सावंत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत, पोलीस निरीक्षक संदीप कोळी,सर्व संचालक आप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर होन, रमेश आभाळे, बाळासाहेब वक्ते, बाळासाहेब पानगव्हाणे, संजय औताडे, अशोकराव औताडे, विजय रोहोम, गणपतराव औताडे, रामभाऊ औताडे, यांच्यासह संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी संचालक पदाधिकारी, शेतकरी सभासद, कार्यकर्ते, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले.