आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून उजनी टप्पा क्रमांक एक सुरू – संदीप थेटे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
उजनी उपसा सिचंन योजनेच्या टप्पा क्रमांक एकच्या शहापुर येथील ३१५ के.व्ही.ए. क्षमतेच्या ट्रान्सफार्मरमधील ऑईल व तांब्याच्या कॉईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्यामुळे जवळके, धोंडेवाडी, शहापूर, बहादराबाद या गावातील पाझर तलाव, साठवण बंधारे भरण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु बोले तैसा चाले या वचनाप्रमाणे २०१९ ला निवडून आल्यापासून आ.आशुतोष काळे यांनी दरवर्षी उजनी उपसा सिंचन योजना सुरू ठेवली आहे. याही वर्षी टप्पा क्रमांक एक सुरू करणे बाबत आलेल्या अडचणी दूर करून मागील वर्षीचे थकीत बिल आ. आशुतोष काळे यांनी पदरमोड करून भरले आहे. चोरी गेलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी भाडेतत्त्वावर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला असून उजनी उजनी टप्पा क्रमांक एक सुरू झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप थेटे यांनी दिली आहे. कोपरगाव मतदार संघातील निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर व मतदार संघातील राहाता तालुक्यातील चितळी, धनगरवाडी, वाकडी या गावातील पाझर तलाव, साठवण बंधारे, ओढे पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
उजनी उपसा जलसिंचन योजना सुरू ठेवण्यासाठी सर्व प्रकारची जबाबदारी घेण्याचा मी शब्द दिलेला असून दिलेला शब्द मी कधीही पडू दिला नाही आणि देणार पण नाही. सिमेंट पाईप टाकून निळवंडेचे पाणी या चारही गावात आणण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जोपर्यंत निळवंडे चे पाणी या चार गावात येत नाही तोपर्यंत उजनी उपसा जलसिंचन योजना सुरूच राहील. उजनी उपसा सिंचन योजनेच्या ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल व तांब्याच्या कॉईल चोरट्यांनी चोरून नेल्या त्यामुळे योजना सुरू होण्यास उशीर झाला. भविष्यकाळात अशा अडचणी येणार नाहीत यासाठी लाभधारक गावातील नागरिकांनी यापुढे a काळजी घ्यावी.-आ.आशुतोष काळे
ज्या ठिकाणी निळवंडे कालव्याचे पाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी गोदावरी कालव्याच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून उजनी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक एक मधून त्या गावातील पाझर तलाव, साठवण बंधारे भरून दिले जात आहेत. परंतु यावर्षी या टप्पा क्रमांक एकच्या ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल व तांब्याच्या कॉईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्यामुळे या गावातील नागरिकांच्या चिंता वाढल्या होत्या. या चिंता आ.आशुतोष काळे यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून दूर केल्या आहेत. त्यामुळे या गावातील साठवण तलाव, बंधारे, ओढे भरण्यास सुरूवात झाली असून त्याबद्दल जवळके, धोंडेवाडी, शहापूर, बहादराबाद या गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.