Breaking
संजीवनी उद्योग समूह

राष्ट्रीय सहकार धोरणामुळे देशाच्या प्रगतीत भर-विवेकभैय्या कोल्हे

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय स्तरावर अमित शहा यांच्या मार्फत सहकार क्षेत्राच्या उत्कर्षासाठी स्वतंत्र खाते निर्माण करून राष्ट्रीय सहकार धोरण जाहिर केले ते देशाच्या प्रगतीत भर घालणारे आणि सहकाराच्या आर्थीक बळकटीसाठी पोषक असल्याची प्रतिक्रिया इफको नविदिल्लीचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली. ग्रामिण अर्थकारणाचा पाया सहकारी सोसायटीमुळे मजबुत झाला असुन त्याच्या व्याप्तीसाठी हे धोरण स्वागतार्ह आहे असेही ते म्हणांले.त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, सहकारातुन समृध्दी या दिशेने देशाच्या भविष्याची वाटचाल सुखकर व्हावी यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सहकार धोरण नुकतेच जाहिर केले ते लोकशाही मुल्यांची वृध्दी करणारे आहे. देशात ८ लाख ५० हजार सहकारी संस्थेच्या माध्यमांतुन ३० कोटी सभासद शेतकरी कार्यरत आहेत. सकल उत्पन्नात सहकाराचा वाटा मोठा आहे. या धोरणांतुन युवक, महिला, शेतकरी, उद्योजक यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, आत्मनिर्भरता मजबुत करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर जाणिवपुर्वक प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या स्थापनेमुळे भारतातील शेतकरी व सहकारी संस्था थेट जागतिक मुल्यसाखळीत सहभागी होणार आहे त्यातुन नैसर्गीक शेतीला चालना देणे, शेतीमाल विक्रीसाठी पॅक्स संस्थांना ई नाम प्लॅटफार्मशी जोडणे, ब्लॉकचैनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनांत वाढ आदि उपक्रम या नव्या राष्ट्रीय सहकार धोरणातुन रूजले जाणार आहेत.

जाहिरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करून त्यानुरूप सहकार क्षेत्राची सुसंगत ध्येय धोरणे अंमलबजावणी केली. या देशातील सहकार क्षेत्राने जगाला दिशा दाखवुन त्यातुन शेतकरी सभासदांसह सर्वांची आर्थीक क्रयशक्ती वाढविण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराचा मंगलकलश महाराष्ट्र राज्यात स्थापन करून त्यातुन विकासाची बीजे पेरली आहेत. आर्थीक न्याय, नैतिक नेतृत्व यांच्या माध्यमांतुन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जाहिर केलेले राष्ट्रीय सहकार धोरण मानवतेच्या उज्वल भवितव्याचे मोठे पाउल आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारणाला दिशा देण्यांत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी केलेले काम सहकाराचा वारकरी म्हणून नजरेसमोर दीपस्तंभासारखे उभे आहे असेही शेवटी ते म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »