मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व राज्याच्या राजकारणातील कार्यक्षम, लोकप्रिय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एक आरोग्यविषयक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मनिषंकर आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून, मोतीबिंदू तपासणी व आवश्यक शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. नेत्ररुग्णांसाठी ही एक दुर्मिळ आणि अमूल्य संधी आहे.
शिबिराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
२२ जुलै (मंगळवार) – मारुती मंदिर, दहेगाव बोलका
२३ जुलै (बुधवार) – बाजारतळ, रवंदे
२४ जुलै (गुरुवार) – हनुमान मंदिर, रांजणगाव देशमुख
२५ जुलै (शुक्रवार) – साईमंदिर परिसर, वाकडी
वेळ: रोज सकाळी १० ते दुपारी २
या शिबिरासाठी येताना आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. तपासणीसाठी व शस्त्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडत असून, कोपरगावातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन मा.आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क:८१८१९०९०९० या क्रमांकावर करण्यास सांगण्यात आले आहे.”आरोग्य हीच खरी संपत्ती” या मूल्याला अनुसरून भाजपा कोपरगावचा सामाजिक उपक्रम जनतेसाठी एक दीपस्तंभ ठरणार आहे.