गौतम पब्लिक स्कूलमध्ये सौ.चैताली काळेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ.चैताली काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर दुपारच्या सत्रात शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी मेस विभाग परिसर येथे स्वच्छता मोहीम राबविली व सायंकाळी इंटर हाऊसेस फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येवून अनोख्या पद्धतीने सचिव सौ.चैताली काळे यांना वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. संध्याकाळच्या सत्रात प्राचार्य नूर शेख यांच्या सहित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्रमदान करून क्रिकेट, हॉकी, फुटबॉल ग्राउंड व शाळेच्या परिसराची स्वच्छता केली.वाढदिवसाचे औचित्य साधत फुटबॉल मैदानावर इंटर हाऊसेस स्पर्धांचा शुभारंभ संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य नूर शेख, सौ.सुशीलामाई काळे महविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटचे प्राचार्य सुभाष भारती, मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे आदी मान्यवर उपस्थित होते.

इंटर हाऊसेस स्पर्धेचा उद्घाटनपर सामना १४ वर्षाखालील ऑरेंज हाऊस व ब्ल्यू हाऊस यांच्या दरम्यान झाला. सदर सामना ऑरेंज हाऊस ने सडन डेथ मध्ये जिंकला. दुसरा सामना हाऊस व ग्रीन हाऊस दरम्यान झाला सदर सामना ग्रीन हाऊसने सडन डेथ मध्ये जिंकला. वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेले सर्व उपक्रम शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडले. त्याकामी क्रीडा विभागातील क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, ऑरेंज हाऊसचे मास्टर नसिर पठाण, ब्ल्यू हाऊसचे मास्टर प्रकाश भुजबळ, येलो हाऊसचे मास्टर उत्तम सोनवणे व शिक्षक वृंद आदींनी मेहनत घेतली. दिवसभरात राबविण्यात आलेल्या सर्व स्पर्धांचे सूत्रसंचालन कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले.