संजीवनी अकॅडमीचा श्रेय महिंद्रकर व ईश्वरी लोहकणे हे सीबीएसई परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम
संजीवनीच्या प्रतिभावंतांनी जपली १०० टक्के निकालाची परंपरा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) फेब्रवारी २०२५ मध्ये घेतलेल्या इ. १० वीच्या परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन यात संजीवनी अकॅडमीच्या प्रतिभावंतानी स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात श्रेय रूपेश महिंद्रकर याने व ईश्वरी निलेश लोहकणे या दोघांनीही ९९ टक्के गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडवत स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला. श्रेयन संतोष भोर हा ९७. २० टक्के गुण मिळवुन दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. रियांश जयप्रकाश कारवा याने ९७ टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळविला. सिध्दांत विलास महिरे यांने ९६. ४० टक्के मिळवुन चौथ्या क्रमांकावर शिक्कामोर्तब केले. एकुण ९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. उत्कृष्ट निकालाने संजीवनी अकॅडमीने आपला शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा सिध्द केला आहे, असे संजीवनी अकॅडमीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की श्वेता विजय मोरे व आर्या सुजितकुमार सोनवणे यांनी प्रत्येकी ९६. २० टक्के गुण मिळविले. तसेच संस्कार संतोष बेलदार याने ९५. ८०, निशिगंधा शांताराम वाबळे हिने ९५. ४०,आदित्य धर्मराज भामरे व पार्थ दत्तात्रय रहाणे यांनी प्रत्येकी ९५. २० टक्के गुण मिळविले. १२ विद्यार्थ्यांनी ९५ टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ९० टक्यांच्या पेक्षा अधिक ३४ व ८० टक्यांपेक्षा अधिक ६६ विद्यार्थ्यांनी गुण मिळविले. मराठी मध्ये ६ व संस्कृत या विषयामध्ये २ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले. इंग्रजी विषयात ४८ विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी व संस्कृत हे विषय मिळून ५६, गणित विषयात १०, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात ७८, सायन्स विषयात १५ व सोशल स्टडीज विषयात २५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९० पेक्षा अधिक गुण मिळविले.

संजीवनी अकॅडमीचे विद्यार्थ्यांनी विविध खेळ, सांस्कृतिक, विज्ञान प्रदर्शन , तांत्रिक स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, अशा प्रत्येक बाबतीत बक्षिसे मिळवुन आपली आघाडी सिध्द केली आहे. आता शैक्षणिक गुणवत्तेमध्ये १०० टक्के निकाल देवुन स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, एक्झिक्युटिव्ह प्रिंसिपाल रेखा पाटील, प्रिंसिपाल शैला डुबे , सर्व शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.