न्यू इंग्लिश स्कूलदेर्डे चांदवड चा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ९०.०० %

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवडचा एस.एस.सी. परीक्षा २०२५ चा शेकडा निकाल ९०.००% एवढा लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेसाठी एकूण ५० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ०३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १२ प्रथम श्रेणी, १८ द्वितीय श्रेणी, तर १२ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी मिळविली आहे. विद्यालयात सर्वाधिक ८९.२०% गुण मिळवून कु.अनुराधा जयराम गवळी प्रथम आली आहे.

तर कु. गौरी दगडू सूर्यवंशी या विद्यार्थिनीने ७६.६०% गुण मिळवून द्वितीय व रितेश परागीर गोसावी या विद्यार्थ्याने ७६. ४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे,इन्स्पेक्टर नारायण बारे सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, सर्व पालक, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.